Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडधारुर, केजसह बारा गावच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला मांजरा धरणात 84 टक्के पाण्याचा...

धारुर, केजसह बारा गावच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला मांजरा धरणात 84 टक्के पाण्याचा साठा


बीड/केज (रिपोर्टर)ः- आठ दिवसापूर्वी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे राज्यभरातील सर्व धरणात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात जमा झाला. काही धरणं पुर्णतः भरली तर काही धरणाने 50 टक्याच्या पुढे पातळी गाठली. केज तालुक्यातील मांजरा धरणात 84 टक्के पाण्याचा साठा जमा झाला असून या पाणी साठ्यामुळे लातूर, बीड जिल्ह्यातील केज, धारुर, आणि 12 गावच्या ग्रामपंचायतीचा पाण्याचा प्रश्‍न मिटला. सलग तिन वर्ष झालं हे धरण भरत आहे. दुष्काळामध्ये मांजरा धरण पुर्णतः आटलं होतं. त्यामुळे नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली होती. यंदाही धरण भरत आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस पडला होता. मात्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या सुरूवातीला पावसाने धुव्वाधार सुरूवात केली. आठ दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पाणीच पाणी झाले. या पावसामुळे राज्यभरातील जवळपास सर्वच धरणामध्ये पाण्याचा साठा समाधानकारक जमा झाला. बीड जिल्हयातीलही सर्व धरणे भरले. लातूर, केज, धारुर येथील नागरीकांना पाणी पुरवठा करणार्‍या मांजरा धरणात 84 टक्के पाण्याचा साठा जमा झाला. गेल्या तिन वर्षापासून हे धरण भरत आहे. यंदाही धरणात पाणीसाठा चांगला जमा झाल्याने नागरीकांचा पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!