परळी (रिपोर्टर):- परळी तालुक्यातील पूर्वी भाजपच्या ताब्यात असलेली व अविश्वास ठराव संमत झालेली वानटाकळी ग्रामपंचायत ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत माने यांची सरपंच तर अनिल घाडगे यांची उपसरपंच पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा न. प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांनी स्वागत करत अभिनंदन केले आहे. यावेळी सरपंच हनुमंत माने, उपसरपंच अनिल घाडगे, सदस्य राम जाधव, श्रीमती पंचफुला आजले, श्रीमती पार्वती गवळी, श्रीमती रत्नमाला आजले, श्रीमती पार्वती मुंडे, श्रीमती अश्विनी पोखरे आदी सर्व सदस्यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी वानटाकळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दिलीपराव गायके, मा. सरपंच रुद्रा जाधव, अनिल जाधव, गोपाळ जाधव, एकनाथ घाडगे, यांसह वानटाकळी तांडा येथील सरपंच विनायकराव राठोड आदी उपस्थित होते. दरम्यान नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे ना. धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले असून, लोकाभिमुख काम व्हावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.