Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडऔरंगाबाद जालन्यानंतर बीडला विक्रमी पावसाची नोंद

औरंगाबाद जालन्यानंतर बीडला विक्रमी पावसाची नोंद

बीड (रिपोर्टर)ः- सप्टेंबर महिन्यामध्ये मराठवाड्यात धुव्वाधार पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. खरीप पिकांचे मोठे नूकसान झाले. आजही शेकडो हेक्टर मधील पिके पाण्यात आहेत. औरंगाबाद जालना नंतर बीड जिल्ह्यात विक्रमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्हाभरात 277.6 टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे पुर्णत भरली आहे. मांजराचा पाणीसाठी 80 टक्के गेला. माजलगांव, बिंदुसरा हे धरण पुर्णतः भरुन ओसाडूंन वाहत आहे.
बंगालच्या उप सागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात पावसाला सुरूवात झाली. धो-धो पाऊस पडल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. रिकामे असलेले तलावे पुर्णतः भरले. खरीप पिकांचे मोठे नूकसान झाले. मराठवाड्यातील लाखो हेक्टरमधील पिके वायाला गेली. नूकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू आहे. आजही पिकं पाण्यात आहे. पाण्याचा पातळीत मोठी वाढ झाली. मराठवाड्यात पडलेल्या पावसात सर्वांधीक पावसाची नोंद औरंगाबाद, जालना नंतर बीडमध्ये झाली आहे. बीड जिल्ह्यात 277.6 टक्के पाऊस पडला आहे.

Most Popular

error: Content is protected !!