Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडपोलीस कर्मचारी बनसोडे यांना बडतर्फ करा उपजिल्हाप्रमुख वरेकर यांची एसपींकडे मागणी

पोलीस कर्मचारी बनसोडे यांना बडतर्फ करा उपजिल्हाप्रमुख वरेकर यांची एसपींकडे मागणी


बीड (रिपोर्टर)- शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जालिंदर बनसोहे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत खोटा गुन्हा दाखल केला आहे. सदरील प्रकरणी बनसोहे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
   निवेदनात वरेकर यांनी म्हटले आहे की, संदीपान दत्तोबा बडगे (रा. बेलखंडी पाटोदा) यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी जालिंदर बनसोडे यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. जनतेचे रक्षकच अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करत असतील तर ही पोलीस खात्याची बदनामी आहे. अशा कर्मचार्‍यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, बनसोडे यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गणेश वरेकर यांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!