Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडभावी नगरसेवक कामाला लागले ,सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरूवात, वार्डातील लोकांची अनेकजण ख्याली...

भावी नगरसेवक कामाला लागले ,सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरूवात, वार्डातील लोकांची अनेकजण ख्याली खुशाली विचारू लागले; रस्त्या,नाल्यांचे प्रश्‍न उपस्थित होवू लागले

बीड (रिपोर्टर):- नगर पालिका, महानगरपालिकाच्या निवडणूका डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान होणार आहे. निवडणूकीला काही महिन्याचा अवधी असला तरी भावी नगरसेवकांनी आत्तापासूनच कामाला सुरूवात केली. आपआपल्या वार्डात नागरिकांचे काही प्रश्‍न आहेत का? याची माहिती घेत लोकांच्या अडीअडचण सोडवण्याकडे ‘भावी’ लक्ष देवू लागले. बीड शहरासह जिल्हाभरातील इतर नगर पालिकेच्या निवडणूका या टप्प्यामध्ये होणार असल्याने जिल्हाभरातील इच्छुकांनी बाशिंग बांधले असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणूका डिसेंबर, जानेवारी या महिन्यामध्ये होणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणूका लांबणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र कोर्टाने वेळेवर निवडणूका घेण्याचे आदेश दिल्यानंतर सदरील निवडणूका या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होवू शकतात. निवडणूका लढवण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आत्तापासूनच कामाला लागले. गत निवडणूकीमध्ये नगराध्यक्षपद जनतेतून होतं. त्यामुळे नगरसेवकांना तितका भाव नव्हता. यावेळी मात्र नगराध्यक्षपद नगरसेवकातून असल्याने जो तो नगरसेवक होण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करू लागला. बीड शहरासह जिल्हाभरातल्या इतर नगर पालिका आणि नगरपंचायतीच्या एकत्रित निवडणूका होणार आहे. एका-एका वार्डात अनेक जण इच्छुक आहेत. काही कार्यकर्ते प्रमुख पक्षाचं तिकीट मिळावं म्हणून आत्तापासून फिल्डींग लावू लागले तर काहींनी तिकीट मिळो अथवा न मिळो अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली. लोकांना आकर्षित करण्यासाठी वार्डातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न भावी नगरसेवक करू लागले. कित्येक वार्डामध्ये रक्तदान शिबीरासह इतर सामाजिक उपक्रम राबवतांना दिसून येत आहे तर काही ठिकाणी इच्छुक रस्त्या, नाल्याचे प्रश्‍न उपस्थित करत नगर पालिकेला जाब विचारत असल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!