बीड (रिपोर्टर): मणिपूरमध्ये दोन महिलांवर सामूहिकपणे अत्याचार करण्यात आला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कालयासमोर आज महिलांच्या वतीने महानिदर्शने करण्यात आले. या वेळी माजी आ. उषाताई दराडे, मनिषा तोकले, सविता शेटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर राज्यात दंगल सुरू आहे. ही दंगल केंद्र सरकारला अद्यापही आटोक्यात आणता आली नाही. मे महिन्यात दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकाराला तेथील राज्य सरकार जबाबदार आहे. हे राज्य बरखास्त करून त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी महिलांनी तीव्र निदर्शने केली. या वेळी माजी आ. उषाताई दराडे, मनिषा तोकले, सविता शेटे, अॅड. जोसेफ, अॅड. हेमा पिंपळे, सुशिला मोराळे, मंगल जगताप, मीरा गुंजाळ, सुवर्णा चव्हाण, शेख गुलरुख, वनिता चाळक, रुक्मीण नागापुरे, रेहाना पठाण, ललीता तांबारे, अनिता वाघमारे, वर्षा माने, कावेरी पवार, मनिषा पायाळ, भाकरे नैना यांच्यासह आदी महिलांची उपस्थिती होती.