Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडजिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल 17 सप्टेंबपर्यंत देण्याच्या हालचाली ,राधाबिनोद यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर जिल्हा...

जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल 17 सप्टेंबपर्यंत देण्याच्या हालचाली ,राधाबिनोद यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर जिल्हा प्रशासन हरकतमध्ये

रस्त्याच्या छोट्यामोठ्या डागडुजी तात्काळ करा, संबंधितांना सूचना
वीज पोल तात्काळ उभारा, खंडीत वीजपुरवठा सुरू करा, महावितरणला सूचना
पावसामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानी, अहवालही तसेच तयार होणार
बीड (रिपोर्टर):- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे 17 सप्टेंबरपर्यंत पुर्ण करण्याचे प्रयत्न करत अहवाल सादर करण्याच्या तयारीत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राधाबिनोद यांनी गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. नुकसानी या वेगवेगळ्या असून त्या स्तरावर अहवाल सादर केले जाणार आहेत. तत्पुर्वी रस्त्यांची डागडुजी आणि खंडीत झालेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या असून वाहून गेलेल्या पुलाबाबत आणि अन्य नुकसानीबाबत लवकरात लवकर निर्णय घेतले जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले.
   जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी काल गेवराई, बीड तालुक्यातील तब्बल 20 गावात जावून शेतकर्‍यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. अनेक ठिकाणी शेती उद्ध्वस्त झाली असून काही ठिकाणी शेतच  वाहून गेले आहेत. कुठे बंधारे फुटले आहे तर कुठे पुल वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. महावितरण कंपनीचे विद्युत पोल अनेक ठिकाणी कोसळले आहेत. या परिस्थितीचा संपुर्ण आढावा घेतल्यानंतर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी नुकसानीचा अहवाल 17 सप्टेंबरपर्यंत पुर्ण करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. औरंगपूर येथील केटीवेअर बंधारा वाहून गेला आहे. या नुकसानीला वेगळे निकष आहेत. त्याचा स्पेशल अहवाल जाणार आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीबाबत संबंधित खात्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडचण निर्माण होत आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाल्याने अनेक गावांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत. डागडुजीचे काम तात्काळ पूर्ण करून घेण्याबाबत संबंधितांना आदेश दिल्याचेही राधाबिनोद यांनी सांगितले. तर महावितरण कंपनीला ज्या ज्या ठिकाणची वीज खंडीत आहे, विजेचे पोल पडलेले आहेत ते तात्काळ उभारण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे सांगून गेवराई, बीड तालुक्यात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले.
000

Most Popular

error: Content is protected !!