Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमअंबेसावळीत चोरट्यांचा धुमाकूळ शेजार्‍यांच्या घरांना कड्या लावून धाडसी चोरी; गावकरी उठताच चोरट्यांनी...

अंबेसावळीत चोरट्यांचा धुमाकूळ शेजार्‍यांच्या घरांना कड्या लावून धाडसी चोरी; गावकरी उठताच चोरट्यांनी पळ काढला


पिंपळनेर (रिपोर्टर)- पिंपळनेरपासून काही अंतरावर असलेल्या अंबेसावळी येथील सुभाष चंदु मुसळे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून घरामधून १० ग्रॅम सोन्यासह नगदी दहा हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना मध्यरात्री घडली. या वेळी चोरट्यांनी गावातील अन्य घरांच्या कड्या लावल्या. काही वेळानंतर गावकरी जागे झाल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती कळताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यापुर्वीही गावात छोट्या-मोठ्या चोर्‍या झाल्या होत्या.


लक्ष्मीपुजनाच्या दिवशी चोरट्यांनी चोरीच्या घटनेला अंजाम दिल्याने पिंपळनेर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. रात्री सुभाष चंदु मुसळे हे आपल्या घरामध्ये झोपले असता १ ते दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गावामध्ये प्रवेश केला. मुसळे यांच्या निवासस्थान परिसरातील सर्व घरांच्या कड्या बाहेरून लावल्या. त्यानंतर चोरट्यांनी मुसळे यांच्या घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये चोरी करून आतील एक पेटी, बाहेर आणली. या कालावधीत गावातील अन्य लोक जागे झाले. त्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावर पोबारा केला. सदरची पेटी ही गावालगतच्या एका शेतात आढळून आली आहे. चोरट्यांनी या वेळी मुसळे यांच्या घरातून दहा ग्रॅम सोन्यासह नगदी दहा हजार रुपये चोरून नेले. या घटनेची माहिती कळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पीएसआय ज्ञानदेव सानप, जमादार एस.एन. राठोड, डापकर हे घटनास्थळी डेरेदाखल झाले आहेत. पुढील तपास राठोड करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!