Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडजायकवाडीच्या अधिकार्‍यांनी बंधार्‍यावरील दरवाजे काढले नाही

जायकवाडीच्या अधिकार्‍यांनी बंधार्‍यावरील दरवाजे काढले नाही


कुक्कडगाव (रिपोर्टर)- १० दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे सर्व नद्या-नाले ओसांडून वाहिल्या. कुक्कडगाव येथील बंधार्‍यावरील पुर्ण दरवाजे जायकवाडी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी काढून ठेवले नसल्याने या बंधार्‍यात पाणी जमा झाले आणि हे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात उलथले असून दहा ते बारा शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.


पावसाळ्याच्या तोंडावर बंधार्‍यावरील दरवाजे काढणे गरजेचे असताना कुक्कडगाव येथील बंधार्‍यावरील पुर्ण दरवाजे जायकवाडी विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी काढले नाही. त्याचा परिणाम पावसामध्ये दिसून आला. दहा दिवसांपुर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे बंधार्‍यात पाणी जमा झाले. दरवाज्यामुळे बंधारा तुंबल्याने अधिकचे पाणी बाजुच्या शेतकर्‍यांच्या शेतात उलथले. दहा ते बारा शेतकर्‍यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता ही नुकसान भरपाई कोण देणार? असा प्रश्‍न उपस्थित होत असून या प्रकरणी दोषी कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!