Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडमनोज पाटलांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेरमधील लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनोज पाटलांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेरमधील लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद


पिंपळनेर (रिपोर्टर)- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भाजप युवा मोर्चाचे मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज पिंपळनेर येथे मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी शिवराज पवार, सतीश पाटील, बंडु दुबाले, भारत जवळकर, गोरख कांडेकर, नाथाराम नरवडे, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपळनेरचे माजी सरपंच लक्ष्मीनारायण चरखा यांचे निधन झाल्याने मनोज पाटील यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या आणि सामाजिक उपक्रमातून राबवला. हार-तुर्‍यांसह अन्य बडेजाव न करता आज पिंपळनेर येथे परिसरातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाचे आयोजन केले होते. सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन झाले. मोफत लसीकरणासाठी परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!