Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडओबीसी आरक्षणासाठी जिल्हाभरात भाजपाचे आंदोलन

ओबीसी आरक्षणासाठी जिल्हाभरात भाजपाचे आंदोलन


बीड (रिपोर्टर)- ओबीसींचे राजकीय आरक्षण अद्यापही निकाली निघाले नाही, राज्य सरकार आरक्षणासंदर्भात गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत आज भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन झाले. त्याचबरोबर जिल्हाभरातही भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकार्‍यांकडे सोपवले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यभरात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातही आंदोलन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या वेळी देवीदास नागरगोजे, विक्रांत हजारे, भगीरथ बियाणी, लक्ष्मण जाधव, संध्या धसे, संग्राम बांगर, अनिल चांदणे, शांतीनाथ डोरले, कपिल सौदा, नागेश पवार, संजीवनी राऊत, शरद झोडगे, संध्या राजपूत, गणेश बहिरवाळ, कृष्णा तिडके, विलास सातपुते, पंकज धांडे, महेश सावंत सह आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!