Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमलिंबागणेश येथील हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांची धाड 58 हजाराचा दारू केली नष्ट

लिंबागणेश येथील हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांची धाड 58 हजाराचा दारू केली नष्ट


नेकनूर (रिपोर्टर):- नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लिंबागणेश येथील हातभट्टी अड्ड्यावर पोलीसांनी आज सकाळी धाड टाकली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात रसायन व हातभट्टी बनवण्याचे साहित्य आढळून आले. पोलीसांनी 58 हजार रूपयाची हातभट्टी दारू नष्ट केली. यात 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून लिंबागणेश येथे हातभट्टी दारू गाळली जात आहे. या हातभट्टी अड्ड्याची माहिती नेकनूर पोलीसांना झाल्यानंतर आज सकाळी पोलीसांनी अड्ड्यावर धाड टाकत रसायनासह दारू बनवण्याचे साहित्य जप्त केले. 58 हजार रूपयाची दारू नष्ट करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, सुशांत सोनवणे, कांबळे, दिडोळ, ढोबळे, घोलप, चव्हाण यांनी केली. या प्रकरणी तिघा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!