Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईआघाडी सरकारच्या विरोधात गेवराईत आंदोलन

आघाडी सरकारच्या विरोधात गेवराईत आंदोलन


गेवराई- महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे व निष्काळजीपणामुळे रद्द झाले. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकिला आरक्षणामुळे मुकावे लागणार आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मनामध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान गेवराई येथे ही आ.लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर आघाडी सरकारच्या नावाने घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग थडगे, प्रल्हादराव माने, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जे.डी. शहा, सभापती दिपक सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, पं. स.सदस्य शाम कुंड, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र भंडारी,नगरसेवक अजित कानगुडे, भगवान घुंबार्डे,याहीया खान, नगरसेवक फेरोज अहेमद, लक्ष्मण चव्हाण, संतोष सुतार, बंडूभाऊ बारगजे, संतोष मुंजाळ, कृष्णा ढाकणे, यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करून तहसीलदार सचिन खाडे यांना निवेदन देण्यात आले.

Most Popular

error: Content is protected !!