आष्टी ( रिपोर्टर ) :-महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाची जनगणना करुन इंपेरियल डाटा बनवून वेळेत सुप्रीम कोर्टामध्ये दाखल न केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजावर महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे अन्याय झाल्याचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय धोंडे धरणे आंदोलन वेळी म्हणाले यावेळी आघाडी सरकारचा निषेध नोंदवत अजय धोंडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नायब तहसिलदार निलिमा थेऊरकर यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद आहे की ओबीसी समाजाचा विश्वासघात केला त्या अनुषंगाने आघाडी सरकारचे विरोधात भारतीय जनता पार्टी तालुका आष्टी यांचे वतीने धरणे अंदोलन करण्यात येत आहे.
ओबीसी समाजाची जनगणना करुन इंपेरियल डाटा बनवून वेळेत सुप्रीम कोर्टामध्ये दाखल न केल्याने मा.सर्वोच्च न्यायालय यांनी ओ.बी.सी.समाजाची जनगणना नसल्यामुळे ओ.बी.सी.समाजाचे राजकीय आरक्षण ओघळून महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूका घेण्याचे आदेश दिलेले आहेत . महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकामध्ये ओ.बी.सी.समाजावर मोठा अन्याय होत आहे . त्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी तालुका आष्टी यांच्या वतीने धरणे अंदोलन करून तहसिलदार आष्टी यांना निवेदन देण्यात आले यावेळी बीड जिल्हा सरचिटणीस अजय दादा धोंडे, अ.जा.मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अँड.वाल्मीक निकाळजे, भाजपा ता.अ. अँड.हनुमंतराव थोरवे, जिल्हा सचिव शंकर देशमुख, जेष्ठ नेते एन.टी.गर्जे, तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,बाबासाहेब गर्जे, सरपंच संजय नालकोल, संदीप नागरगोजे, आण्णासाहेब लांबडे, उध्दव विधाते, प्रा.भरत गर्जे, अस्ताक शेख, विनोद निकाळजे, दिपक भुजबळ आदी उपस्थित होते.