Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबांगरवाडी साठवण तलावाची दुरुस्ती करा तलावात डुबकी आंदोलन

बांगरवाडी साठवण तलावाची दुरुस्ती करा तलावात डुबकी आंदोलन


बीड (रिपोर्टर)- पाटोदा तालुक्यातील बांगरवाडी येथील साठवण तलावाला भगदाड पडले. यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असून तलावाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी आज तलावात डुबकी मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डॉ.लक्ष्मण ढवळे यांच्यासह आदींचा सहभाग होता.

बांगरवाडीच्या तलावाला भगदाड पडून अनेक महिने उलटले मात्र तलावाची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. सध्या तलाव भरल्याने भगदाडातून पाणी गळत आहे. हे भगदाड वेळीच बुजवले नाही तर भविष्यात यातून मोठी दुर्घटना घडू शकते, जेणेकरून तलावाच्या खाली राहणार्‍या नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. शासनाच्या निषेधार्थ आज सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तलावात डुबकी मारो आंदोलन करण्यात आले. या वेळी बंडोपंत काळे, पोपट काळे, सुरेश सस्ते, बारीकराव काळे, भाऊसाहेब काळे, कृष्णा तांबारे, गणेश काळे, तुकाराम सस्ते, उत्तम काळे, पांडुरंग रुपनर, देवीदास काळेंसह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!