Monday, January 24, 2022
No menu items!
HomeUncategorizedरोख-ठोक- मोठ्याची ती हिरोईन,गरीबाची नाची प्रविण मुका!!

रोख-ठोक- मोठ्याची ती हिरोईन,गरीबाची नाची प्रविण मुका!!


जप सोडून दुसर्‍या कुठल्याही पक्षातला माणुस हा भाजपाच्या दृष्टीने तुच्छ असतो आणि तोच भारतीय जनता पार्टीमध्ये आला की सदग्रस्त सत्यवादी देशभक्त होतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस जर रंगलेल्या गालांना पक्षात घेत असेल असे प्रविण दरेकरांचे मत असेल तर चित्रपट अभिनेत्या तथा विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल प्रविण दरेकरांचं मत काय? तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या सौभाग्यवती अल्बममधुन गाणे गातात, व्यासपीठावर जातात, अमिताभ बच्चनसोबत
नाचतातही त्यांच्या कलेबाबत प्रविण दरेकरांना काय म्हणायचे आहे? केवळ हातातून सत्ता गेली म्हणून सत्ताधारी पक्षाला आडचणीत आणण्या हेतू त्यांच्यावर आरोप करतांना भाजपाचे नेते जे पातळी सोडत आहेत आणि त्या पातळी सोड वक्तव्यामुळे भाजपाचे अर्ंतमन महाराष्ट्राला दिसत आहे. उच्च वर्णीयांची ती हिरोईन अन् बहुजनांची ती नाची असं म्हणणारे कित्येक प्रविण मुके का?

rok thok

कंबरेचं सोडून डोक्याला बांधल्याशिवाय आपल्या राजकारणाला यश येणार नाही. असा काहीसा भास आजकालच्या महाराष्ट्र आणि देशातल्या काही राजकारण्यांना झाला आहे. एक तर कर्तव्य, कर्मातून आपण राज्याच्या आणि देशाच्या पटलावर ठळक दिसणार नाहीत हे माहित असल्याने असे राजकारणी अभद्र शब्दाचा प्रयोग करून राज्याच्या आणि देशाच्या पटलावर चर्चेत राहू इच्छितात. मात्र त्यांच्या या शब्द शस्त्राने म्हणण्यापेक्षा मुख मुतारीने राज्यात जे शाब्दीक रणकंद माजते आणि त्या रणकंदातून महाराष्ट्राच्या संस्कारासह संस्कृतीची जी राखरांगोळी होते ते देशाच्या पातळीवर अशोभनीय म्हणावे लागेल. महाराष्ट्र हा जसा योद्धांचा, संत सुफींचा प्रदेश आहे तसा वैचारिक पातळीवर विचारांचा पेरा करणारा प्रदेश आहे. मात्र गेल्या दशकभरापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या पक्षातील राजकीय नेते ज्या पद्धतीने वाचाळ वीर होतांना दिसून येत आहेत ती पद्धत महाराष्ट्राच्या संस्कृतीला अक्षरश: काळीमा फासते. अनेक वेळा, अनेक नेत्यांना आपल्या मुख मुतारीतून बाहेर पडलेल्या शब्दामुळे आत्मचिंतीत व्हावं लागलं, पद गमावावं लागलं तरीही मराठी भाषेची द्विआर्थी शब्द रचना संभोधून स्वत:ला दादा कोंडके ठरू पाहणारे इथे आजही बरेच आहेत. परंतू ज्येष्ठ मराठी अभिनेते दादा कोंडकेंचे शब्द प्रयोग हे मनोरंजनात्मक हास्य कल्लोळ निर्माण करण्यासाठी होतेे. आजच्या राजकारणातील दादा कोंडकेंचे शब्दप्रयोग हे निव्वळ एखाद्याला शिव्या, शाप देण्यासाठी आहेत. खास करून भारतीय जनता पार्टीमधील वाच्चाळ वीरांनी महाराष्ट्रात आणि देशात गेल्या सात वर्षाच्या कालखंडात जे काही शब्द प्रयोग केले आहेत त्या शब्द प्रयोगातून त्या पक्षाची संस्कृती अनेक वेळा समोर आली आहे. काल पर्वा राज्याचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका करतांना


रंगलेल्या गालाची
जी छेड काढली त्यातून भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर वैचारिक एैपत आली. एका भाषणामध्ये प्रविण दरेकरांनी राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारे पक्ष असल्याचे म्हटले आणि हे वक्तव्य करण्यामागे प्रविण दरेकरांचा जो हेतू होता तो नक्कीच अनावधानतेचा नसून स्पष्ट एखाद्या व्यक्तीला ते ही महिलेला टार्गेट करणारा होता. वक्तव्य करण्याच्या दोन-चार दिवस आधी महाराष्ट्रातल्या नामवंत तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. सुरेखा पुणेकर यांनी महाराष्ट्राची लोककला गेल्या चार दशकाच्या कालखंडामध्ये अक्षरश: जिवंत ठेवली. पोटासाठी नाचते मी पर्वा कोणाची म्हणत ती लोक कला नुसती जीवंत ठेवली नाही तर सातासमुद्रापार नेली. लोककलेमध्ये आणि तमाशामध्ये सुरेश पुणेकर या महाराष्ट्रासाठी एक पर्वणी म्हणावी लागेल. एवढ्या मोठ्या तमाशा कलावंताला तुच्छ लेखुन एखाद्या पक्षाला रंगेल संभोधण्यासाठी प्रविण दरेकरांनी राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे असे म्हटले. राष्ट्रवादी जर रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असेल तर भाजपाच्या काही नेत्यांच्या मध्यंतरी व्हिडीओ क्लिप बाहेर आल्या होत्या. त्यात तर ते पुर्णत: नागवे होते त्यावरून भाजप हा संपुर्ण पक्षच नागवा आहे का? तर त्याचं उत्तर नाही येईल. परंतू इथं कोण नागवं आणि कोण रंगेल? यावर भाष्य करण्यासाठी आम्ही हा विषय घेतला नाही. बहुजनातल्या पोरी आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठावर चढल्या किंवा पायात चाळ बांधले तर तीला तुच्छतेने नाची म्हणून हिणवायचे आणि उच्च वर्णीयातल्या पोरी बिकीनीवर व्यासपीठावर चढल्या तर त्यांना हिरोईन म्हणायचे ही भारतीय जनता पार्टीची विचारसरणी प्रविण दरेकरांच्या माध्यमातून समोर आली ती निषेधार्य म्हणावी लागेल. सुरेखा पुणेकर यांचे तमाशामधले योगदान त्यांच्या रंगलेल्या गालातून नव्हे तर घोट्यापर्यंत झाकलेले पाय आणि डोक्यावरच्या पदरापर्यंतचा हिशोब रंगलेल्या गालाची छेड काढणार्‍यांनी ठेवला असता तर ते अधिक बरे वाटले असते. परंतू केवळ शब्दाच्या मार्‍यातून लाळ गाळायची आणि ती मुखमुतारीतून बाहेर काढायची हे भाजपाला जरा जास्तच जमतय.


उच्च वर्णीयांच्या हिरोईन
आणि आमच्या नाच्या?

ये बात कुछ हजम होणारी नाही. प्रविण दरेकरांना आठवत असेल अशा किती तरी तमाशा कलावंतांनी गाल रंगवूनच नव्हे तर पायात चाळ घालून महाराष्ट्राला यशोशिखरावर सांस्कृतिकदृष्ट्या नेवून ठेवले. सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादीत येत आहेत म्हणून राष्ट्रवादी रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष होत असेल आणि हे विचार प्रविण दरेकरांचे असतील तर प्रविण दरेकरांना अजून महाराष्ट्र कळलाच नाही किंवा प्रविण दरेकरांना बहुजनाच्या स्त्रियांना सन्मान कसा द्यायचा हे माहित नाही अथवा त्यांना केवळ उच्च वर्णीयातल्या कमी कपड्यातल्या महिला कलाकारांच्या कलांचाच सन्मान करायचा असतो. महाराष्ट्रामध्ये संस्कार आणि संस्कृतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. मग ते क्षेत्र राजकीय असो की, सामाजिक असो, सांस्कृतिक असो नव्हे-नव्हे तर भुगोलाला सुद्धा इथं अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ते निसर्गाने सह्याद्रीच्या रूपात महाराष्ट्राच्या पदरात टाकलं आहे. सुरेखा पुणेकर जेंव्हा व्यासपीठावर चढतात, गालाची रंगरंंगोटी करतात तेंव्हा त्यांचं चित्र बघा. आमची तमाशाची कलावंत महिला डोक्यावर आंबाडा बांधलेला असतो, त्या अंबाड्यात गजरा असतो, नाकात नथ असते, कपाळी कुंकू असतं, डोक्यावर पद असतो, अंगात जरीची चोळी असते, कोपरापर्यंत बांगड्या असतात, नववारी हिरव्यागार शालूतली आमची ही कलावंत घोट्यापर्यंत शालू पांघरलेली असते, पायात चाळ असतो, पायाच्या बोटामध्ये जोडवे असतात आरि वरचा पाय हा मेहंदीने रंगलेला असतो. आपली कला व्यासपीठावरून सादर करते. इथं तिच्या शरिराचा कणभरही अंश दिसत नाही तरी ती नाची म्हणून हिणवली जाते आणि उच्चवर्णीयाची पोर जेंव्हा अर्ंतवस्त्रामध्ये व्यासपीठावर नाचते, पबमध्ये नाचते, चित्रपटात नाचते तेंव्हा ती हिरोईन होते. हा


दृष्टीदोष
नुसता प्रविण दरेकरांचा नाही तर सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रात बहुजनांच्या लेकरांना कमी लेखण्याचे काम करणार्‍या मनुस्मृतीचा आणि त्या विचारधारेचा आहे. आणि या दृष्टीदोषाला प्रोत्साहन देण्याचे काम भारतीय जनता पार्टी सातत्याने करत आली आहे. गेल्या सात वर्षाच्या कालखंडात भाजपातल्या वाच्चाळ वीरांची यादी काढली तर ती आर्धी भाजप निघेल. महाराष्ट्रातही तिच बोंब भाजपाला एखाद्या व्यक्तीच्या कलेचा आदर करता येत नसेल तर त्या व्यक्तीला नाव ठेवण्यासाठी आपल्या मुखमुतारीतून आपमानजनक शब्द तरी बाहेर काढून नयेत. प्रविण दरेकरांनी ज्या शब्दांचा प्रयोग केला, मुके घेण्याची भाषा केली तसे मुके घेतांना देशपातळीवर भाजपाचे वरिष्ठ नेतेच पकडले गेलेत. याचे आत्मचिंतन दरेकर करणार आहेत की नाही? आपल्या तोंडातून गेलेल्या शब्दामुळे महिला जातीचा अपमान होतो, महाराष्ट्राच्या संस्काराला आणि संस्कृतीला हारताळ फासली जाते, तमाशासारख्या महाराष्ट्रातील लोक कलेला अशा शब्दामुळे तुच्छतेने पहाण्यास वाव मिळतो. एवढी तरी समज विरोधी पक्ष नेते पदावर असलेल्या दरेकरांना असायला हवी. या महाराष्ट्राने


तळ्यात मुतणार्‍या
दादा-भाईंचीही गुर्मी उतरवलेली आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहिर भाषणामध्ये शब्दप्रयोग केला. तळ्यामध्ये पाणी नाही तिथं मग मी काय मुतू काय? या जाहिर भाषणातल्या शब्द प्रयोगाने उभ्या महाराष्ट्राने अजित पवारांनी सळो की पळो करून सोडलं. बोलण्याच्या ओघामध्ये आपली चूक झाल्याची कबुली अजित पवारांनी दिली. एवढच नाही तर आत्मक्लेश आणि आत्मचिंतन करावं लागलं. आजही अजित पवार बोलतांना आपण आता शब्द जपून वापरतो हे सांगतांना त्या शब्द मुतारी घटनेची आठवण करून देतात. मात्र गेल्या काही दिवसाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या नेत्यांनी आपल्या मुख मुतारीतून जो शब्दांचा प्रयोग करायला सुरूवात केली आहे तो सर्वसामान्यांना हिणवणाारा. तत्कालीन प्रदेशाध्यी तथा विद्यमान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांना साले म्हटले, विद्यमान केंद्रीयमंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे कानफट काढले, आ.राम कदमांनी गेल्या दोन वर्षापुर्वी पोरगी पळवून नेण्याबाबत मी मदत करतो म्हणून मी आश्‍वासन दिले आणि आता विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांनी तमाशा कलावंत असलेल्या सुरेखा पुणेकर यांच्यावर टिका टिप्पणी करतांना थेट एखाद्या पक्षालाच मुके घेणारा पक्ष म्हणून संभोधले हे दुरभाग्यच. मला एक गोष्ट इथे सातत्याने मांडावीशी वाटते,
भाजप ही सत्यवादी निर्माण
करणार्‍यांची फॅक्ट्री

आहे की काय? भाजप सोडून दुसर्‍या कुठल्याही पक्षातला माणुस हा भाजपाच्या दृष्टीने तुच्छ असतो आणि तोच भारतीय जनता पार्टीमध्ये आला की सदग्रस्त सत्यवादी देशभक्त होतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस जर रंगलेल्या गालांना पक्षात घेत असेल असे प्रविण दरेकरांचे मत असेल तर चित्रपट अभिनेत्या तथा विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल प्रविण दरेकरांचं मत काय? तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या सौभाग्यवती अल्बममधुन गाणे गातात, व्यासपीठावर जातात, अमिताभ बच्चनसोबत नाचतातही त्यांच्या कलेबाबत प्रविण दरेकरांना काय म्हणायचे आहे? केवळ हातातून सत्ता गेली म्हणून सत्ताधारी पक्षाला आडचणीत आणण्या हेतू त्यांच्यावर आरोप करतांना भाजपाचे नेते जे पातळी सोडत आहेत आणि त्या पातळी सोड वक्तव्यामुळे भाजपाचे अर्ंतमन महाराष्ट्राला दिसत आहे. उच्च वर्णीयांची ती हिरोईन अन् बहुजनांची ती नाची असं म्हणणारे कित्येक प्रविण मुके का?

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!