Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावपं.स.च्या प्रशासकीय इमारत-निवासस्थानाचा ना.धनंजय मुडे,आ.सोळंके च्या हस्ते लोकार्पण सोहळा

पं.स.च्या प्रशासकीय इमारत-निवासस्थानाचा ना.धनंजय मुडे,आ.सोळंके च्या हस्ते लोकार्पण सोहळा


माजलगाव (रिपोर्टर):- बीड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आठ कोटींच्या माजलगाव पंचायत समिती नुतन प्रशासकीय इमारत आणि शासकीय निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा पालक मंत्री ना.धनंजय मुंडे,आणि माजी मंत्री आ.प्रकाश सोंळके यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प.स.सभापती सौ.सोनाली खुळे,उपसभापती डॉ. वशिम मनसबदार, गटविकास अधिकारी सिध्देश्वर हजारे यांनी केले आहे.
माजलगावात आठ कोटींच्या पंचायत समिती नुतन प्रशासकीय इमारत आणि शासकीय निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा दि.१७ सप्टेंबर २०२१ शुक्रवार रोजी दुपारी २ वाजता बीडचे पालक मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री आ.प्रकाश सोंळके भुषवणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून खा.डॉ. प्रितमताई मुंडे,उपस्थित राहणार आहेत.तर जि.प.अध्यक्षा सौ.शिवकन्या सिरसट, आ.संदीप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, आ. लक्ष्मणराव पवार, आ.नमिता मुंदडा, आ.सतिष चव्हाण, (पान ५ वर)
आ.सुरेश धस,आ.विक्रम काळे,आ.संजय दौंड,आ.विनायक मेटे,सभापती अशोकराव डख,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार,उपस्थित राहाणार आहेत.तर सन्माननीय अतिथी म्हणून माजी आ.मोहनराव सोंळके, माजी. आ. राधाकृष्ण होके पाटील, बजरंग सोनवणे,बाबुराव पोटभरे, सभापती जयसिंग सोंळके, कल्याण आबुज, यशोदा जाधव,सविता मस्के, नगराध्यक्ष शेख मंजुर, डॉ. मिंलिद आवाड,सभापती संभाजी शेजुळ, एन.टी.सोंळके, दयानंद स्वामी, खुर्शीद नाईक,वासुदेव सोंळके, पी.जी.हळीकर,हे उपस्थित राहाणार आहेत तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सभापती सोनाली खुळे,उपसभापती डॉ. वशिम मनसबदार,गटविकास अधिकारी सिध्देश्वर हजारे, माजी सभापती अल्काताई नरवडे, सुशिल सोंळके,एस.डी.सुरवसे,चंद्रजीत वानखेडे, शशांक सोंळके, मिलिंद लगाडे,शिवाजी डाके,उषाताई मोरे,सुरेखा जगताप, सुरेखा ठोंबरे, अंबिका काळे,यांनी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!