Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावपात्रूडमध्ये डेंग्यूने महिलेचा मृत्यू अर्धा गाव तापीने फणफणला

पात्रूडमध्ये डेंग्यूने महिलेचा मृत्यू अर्धा गाव तापीने फणफणला


पात्रुड (रिपोर्टर)- माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील एका ५५ वर्षीय महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली असून अर्धा गाव तापीने फणफणला आहे. तरी देखील गावात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

पात्रुड येथील शरीफाबी अत्तार ही महिला गेल्या दोन दिवसांपासून तापीने फणफणल्यामुळे तिला माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या दरम्यान तिची डेंग्यूची चाचणी करण्यात आली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारा दरम्यान आज सकाळी तिचा मृत्यू झाला. कालच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांनी गावात पथक पाठवून स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सांगितले होते.

Most Popular

error: Content is protected !!