Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमपकडलेला गुटखा लाल आणि खराब, सुत्रांचा दावा

पकडलेला गुटखा लाल आणि खराब, सुत्रांचा दावा

छाप्या दरम्यान राजनिवास गुटख्याचे दोन ट्रक सोडले

अद्याप गुटखा माफिया मुळे फरार, माफियाला अटक करा, मराठवाड्यातली गुटखा माफियागिरी बंद करा
बीड (रिपोर्टर)- बीडपासून काही अंतरावर असलेल्या घोडका राजुरी येथे काल पहाटे एसपींच्या पथकाने छापा मारून ७० लाखांच्या आसपास वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा जप्त केला. मात्र या गोडाऊनमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. छापा मारण्यापुर्वी या गोडाऊनमधून राजनिवास गुटख्याचे दोन ट्रक तेथून बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये अन्य काही गुटखाही असल्याचे सांगण्यात येते. जो गुटखा जप्त करण्यात आला त्यामध्ये बहुतांशी गुटखा हा लाल आणि खाण्या अयोग्य आहे, असेही सांगितले जाते. खराब झालेलाच गुटखा जप्तीमध्ये पोलिसांनी दाखवल्याचेही बोलले जात आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी लक्ष घालून गुटखा माफिया याला तात्काळ ताब्यात घ्यावे आणि मराठवाड्यातला गुटख्याचा साठा जप्त करावा.
मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्याला बीड जिल्ह्याचा गुटखा माफिया गुटखा पुरवतो, अशी उघड चर्चा होत असताना अद्यापपर्यंत गुटखा माफिया पोलिसांना सापडला नाही. काल पहाटे जेव्हा बीड तालुक्यातील घोडका राजुरीत गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची माहिती एसपींच्या पथकाला झाली त्यावेळी पथकाने त्याठिकाणी छापा मारला खरा, परंतु या छाप्यात जो माल सापडला आणि गोडाऊनमध्ये जो माल होता यात मोठी तफावत असल्याची चर्चा होत असून छाप्याच्या दरम्यान घटनास्थळी गुटखा माफिया मुळे हा उपस्थित होता असेही सुत्रांचे सांगणे आहे. गोडाऊनमध्ये असलेला कोट्यवधी रुपयांचा गुटखा कालच्या छाप्यात पकडला गेला नाही. उलट जो गुटखा लाल झालेला आहे, खराब झालेला आहे असा बहुतांशी गुटखा काल जप्त केल्याचे बोलले जाते. सत्तर लाखांच्या आसपास जरी हा गुटखा जप्त करण्यात आला असला तरी राजनिवास गुटख्याचे दोन ट्रक या गोडाऊनमधून बाहेर काढण्यात आल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. राजनिवाससह अन्य गुटख्याचा चांगला माल काल मोठ्या प्रमाणावर गोडाऊनमधून बाहेर गेला. जप्तीची कारवाई ही आकड्यात मोठी असली तरी त्या गोडाऊनमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा होता. चांगला गुटखा हा सोडून देण्यात आल्याने पोलिसांच्या या कारवाईवरही प्रानचिन्ह निर्माण होत आहे. अद्यापपर्यंत गुटखा माफियाला अटक झाली नसल्याने यंत्रणा राजकीय दबावाखाली आली की काय, असा सवाल उपस्तित होत सऊन मराठवाड्यातला गुटखा समुळ नष्ट करायचा असेल तर मुळे याला ताब्यात घेऊन कालच्या कारवाईची सखोल माहिती वरिष्ठ पातळीवर अधिकार्‍यांनी घ्यावी आणि त्यातलं सत्य बाहेर काढावं. अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!