Friday, May 20, 2022
No menu items!
Homeक्राईमक्राईम डायरी- संशयाचं ‘भूत’ मानगुटीवर बसलं बायकोला संपवून त्यानं पोलिस ठाण गाठलं

क्राईम डायरी- संशयाचं ‘भूत’ मानगुटीवर बसलं बायकोला संपवून त्यानं पोलिस ठाण गाठलं


पती-पत्नीच्या नात्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो विश्वास. विश्वास असेल तर दोघांचेही नाते शेवटपर्यंत टिकून राहते. मात्र याच विश्वासाची जागा जर संशयाने घेतली तर पती-पत्नीचे नाते खराब व्हायला आणि तुटायला फार वेळ लागत नाही. काही वेळा तर अगदीच क्षुल्लक कारणांवरून पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. नवरा आणि बायको हे नात खूप सुंदर आहे. ते नीट जपता आले पाहिजे. कोणतेही प्रसंग, कितीही, मोठे संकट आले तरी दोघांनी एकमेकांची साथ सोडता कामा नये. त्यासाठी त्यांच्या नात्यात प्रेमाबरोबर विश्वासाचा ओलावा पाहिजे आणि हे नाते सांभाळताना जपताना संशयरुपी काटेरी झुडूप दोघांनाही अलगत बाजूला ठेवता आले पाहिजे. नसता आपल्या मनात काही नसतानाही संशय मनात घर करून तो आपल्या मानगुटीवर बसतो. आणि काही केल्या तो आपला पिच्छा सोडत नाही. राग, लोभ, मद, मत्सर याप्रमाणेच संशय हा व्यक्तिस्वभाव आहे. या संशयामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळतात. पतीचा पत्नीवर संशय किंवा पत्नीचा पतीवर संशय वाढल्याने त्याचे किंवा तिचे कुणा दुसर्‍या व्यक्तीशी अनैतिक संबंध आहेत. असा गैरसमज होवून बसतो. अशा या संशयामुळे पती आणि पत्नी दोघांचेही मानसिक संतुलन बिघडते आणि संसारात वारंवार खटके उडू लागतात. बर्‍याचदा हा संशय सत्याची उकल होण्याआधीच मारा करतो आणि त्याचे परीनाम खूप घातक ठरतात. अशीच एक घटना पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला वारंवार मारहान करणार्‍या पतीने पत्नीचा गळा आवळून व नंतर उशीने तोंड दाबून खून केला. आणि पोलिस ठाण्यात येऊन स्वतः ही माहिती पोलिसांना दिली.


आपल्या चार बहिनी एक भाऊ आणि आई वडीलांसोबत बीड शहरात राहणार्‍या मल्लिका हिचे गेल्या 15 वर्षापूर्वी मोलमजूरी करणार्‍या शेख याकुब शेख खुदबोद्दीन (रा.मासुम कॉलनी,पेठ बीड) याच्यासोबत प्रेम सबंध जुळले आणि त्यांनी ‘लव्ह विथ अरेंज मॅरेज’ करुन संसार थाटला. ते दोघेच मासुम कॉलणी येथे मोठ्या आनंदाने राहू लागले. त्यानंतर त्यांना तिन मुले झाले त्यामध्ये समीर (वय 13 वर्षे), रोशन आणि हर्ष असे त्यांचे नावे. मल्लिका हीला चार बहिनी फरजाना, रिजवाना, शेरखानु, निशाद आणि एक लहान भाऊ बासेद शरिफुर रहेमान असे ते पाच भावंड होते. मल्लिका हिच्या सर्व बहीणीचे लग्ण झालेले असून त्या त्यांच्या सासरी आहेत. तर मल्लिकाचा भाऊ हा सध्या माजलगाव येथे राहतो. लग्नानंतर सर्व काही सुरळीत सुरु असल्याने त्यांच्या सुखी संसारावर तिन फुले उमगली. मोठ्या आनंदात ते राहत असतांनाच शेख याकुब शेख खुदबोद्दीन याच्या मनात मल्लिका बद्दल संशय निर्माण झाला. मल्लिका कोणालाही बोलली तरी तो तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहान करायचा. आपणच आपला जिवनसाथी निवडलेला आहे म्हणत ती ते मुकाट्यान सहन करायची. मात्र मागील दोन वर्षापासून त्याने मल्लिकाला जास्तच त्रास देण्यास सुरुवात केली. तो तीला सतत मारहान करु लागला. मल्लिकाची एक बहिन शेख रिजवाना शेख नजिमउल्ला उर्फ बाबा हि बीड शहरातील महमदीया कॉलणी, सयदअली नगर, पेठ बीड येथे राहते. रमजान महीण्यामध्येही मल्लिकाला तिच्या पतीने बेदम मारहान केली होती. रमजानचे 10 रोजे झाल्यानंतर मल्लिका सकाळी महंमदीया कॉलणी येथील तिच्या बहिनीकडे गेली. त्यावेळीही तिचा चेहरा लाल झालेला होता. तिच्या डोळ्याखाली मार लागलेला होता. तिला तिचा नवरा शेख याकुब याने चारित्र्यावर संशय घेत रात्री खूप मारहाण केली होती. तिला त्याने दवाखाण्यातही नेले नसल्याने तिने स्वत: सरकारी दवाखान्यात जावून उपचार घेतले. तेव्हा ती एक महिना तिच्या बहिनीकडेच राहत होती. त्यावेळी तिचा नवरा तिला घेवून जाण्यासाठी चकरा मारत होता. मात्र तो मल्लिकाला विणाकारण मारत असल्याने त्याला ती घाबरत होती. त्यामुळे ति त्याच्यासोबत गेली नाही. शेख याकुब याने मल्लिका हीची दुसरी बहीण निशाद इरफान शेख हीच्या घरी जावून त्यांना वारंवार विनंती करुन माझ्या बायकोला मलेका हीला नांदायला पाठवून द्या मी तिला परत मारहान करणार नाही. आमच्या मुलांचे खाण्यापिण्याची तारंबाळ होत असल्याचे कारण सांगून तिला घरी घेवून गेला. मात्र त्याच्या संशयाच भूत काही केल्या उतरत नव्हत. तो मल्लिकाला पुन्हा मारहाण करु लागला. दि.11 सप्टेंबर 2021 शेख याकुब याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहान करण्यास सुरुवात केले. ही चांगली राहत नाही, माझ ऐकत नाही, नेहमी भांडण करते असे म्हणून तिचा खून करण्याचा कट रचून शेख याकुब शेख खुदबोद्दीन योन तिन्ही मुलांना त्याच्या आईकडे सोडून रात्री पुन्हा मासुम कॉलणी येथील घरी आला आणी रात्रीच्या वेळेचा फायदा घेवून मलेका हीचा खून करण्याचे त्याने ठरवले. आणि तिला मारहान करु लागला तिचा खून करण्याच्या उद्देशाने गळा दाबला. ती तडफडूलागली तरी देखील त्याने दया मया केली नाही. तिचा गळा दोन्ही हातांनी जोराने दाबून तिचा जिव घेतला. मल्लिका ही जिवंत राहू नये म्हणून परत त्याने तोंडावर उशीने दाबून तिचा खून केला. खून केल्यानंतर तो पळून न जाता रात्री 8.30 वाजता स्वत: पोलिस ठाण्यात गेला अन् ‘मी माझ्या बायकोचा गळा दाबून खून केला‘ असे पोलिसांना सांगितले. ठाणे प्रमुख पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी लगेच पो. ना. मोमीन आणि पो. ना. क्षीरसागर यांना घटनास्थळी पाठवून तो सांगतोय ते खरे आहे का याची खात्री करण्यासाठी पावले तेव्हा त्यांना घराचे कुलूप लावलेले दिसले. पोलिसांनी ते तोडून आतमध्ये प्रवेश केला असता मल्लिका ही जमिनीवर पडलेली दिसली. त्यांनी याची माहिती तत्काळ पोलिस निरिक्षक पाटील यांना दिल्यानंतर ते स्वत: घटनास्थळी दाखल झाले. त्याच्यासोबत एपीआय सुभाष दासरवाड, पीएसआय बनकर, पीएसआय दराडे, पो.ना. मोटे, पो.ना. सुनिल अलगट, पो. कॉ. पिसाळ, पो. कॉ. इनामदार हे देखील होते. फॉरेन्सीक व्हॅन ला बोलावून तत्काळ पंचानामा करण्यात आला. त्यांनतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात आलेला होता. त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मयत मल्लिका हिची बहीण शेख रिजवाना शेख नजिमउल्ला उर्फ बाबा (वय 40 वर्षे, रा. महमदीया कॉलणी, सयदअली नगर, पेठबीड) हीच्या फिर्यादीवरुन शेख मलेका शेख याकुब (वय (38 वर्षे, रा. मासुम काँलणी पेठबीड) हिस तिचा नवरा शेख याकुब शेख खुदबोद्दीन याने तिचे चारित्र्यावर संशय घेवून तिला जिवंत मारण्याचे उदेशाने त्याचे तिन्ही मुलांना त्याचे आईचे घरी सोडून शेख मलेका हिस तिच्या राहते घरी मासून काँलणी, पेठ बीड येथे मारहाण करुन तिला खाली पाडून तिचा दोन्ही हाताने जोराने मरे पर्यंत गळा दाबून तिचा खून केला. तीला ठार मारल्यानंतर परत तिचे तोंडावर उशी ठेवून ति जिवंत राहणार नाही याची खबरदारी घेवून तिचा खुन केला असल्याची तक्रार शेख याकुब शेख खुदबोद्दीन रा.मासुम कॉलनी पेठ बीड याचे विरूध्द दिली. त्यांच्या तक्रारीवरुन शेख याकुब याच्या विरुध्द पेठ बीड पोलिस ठाण्यात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला सकाळी न्यायालयात हजर केले असता आरोपीला 3 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या दरम्यान पोलिसांनी आरोपिची कसून चौकशी करत सर्व पुरावे हस्तगत केले. दि. 14 सप्टेंबर रोजी आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर केले असता. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. या घटनेचा अधिक तपास ठाणेप्रमुख विश्‍वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुभाष दासरवाड हे करत आहेत. त्यांना पो.कॉ. नारायण पिसाळ यांचे सहकार्य मिळत आहे.

Most Popular

error: Content is protected !!