Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडशेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत द्या चिंचोटी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा...

शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत द्या चिंचोटी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा पायी मोर्चा


बीड (रिपोर्टर):- अतिरिक्त पावसामुळे शेती पीकाचे मोठे नुकसान झाले, पंचनामे न करता शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रूपयाची आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी वडवणी तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. 15 सप्टेंबरपासून पायी मोर्चाला सुरूवात झाली होती. हा मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेला होता.


शेतकर्‍यांवर नेहमीच कोणते ना कोणते संकट कोसळत असते. यावर्षी खरीप पीक चांगली आलेली होती. मात्र अतिरीक्त पावसामुळे पीकाचं मोठं नुकसान झालं, शेतकर्‍यांच्या हाता तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. अतिरीक्त पावसामुळे शेती पीकाचे नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्याच्या भानगडीत न पडता शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत देण्यात यावी. यासह इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा पायी मोर्चा धडकला. 15 सप्टेंबरपासून शेतकर्‍यांनी वडवणी येथून मोर्चा काढला होता. या मोर्चात जिल्हाभरातील शेतकर्‍यांचा सहभाग होता.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!