औरंगाबाद (रिपोर्टर):- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौर्यावर आहेत. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, जनतेच्या विकास कामासाठी सरकार जनतेच्या पाठिशी आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषद कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निःसंदिग्ध ग्वाही दिली आहे. ते म्हणाले की, मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन मार्गाच्या बाबतीत प्रेझेंटेशन दिले नाही तरी राज्य सरकार या प्रकल्पात संपूर्ण सहकार्य करणार आहे. मी यामध्ये काही राजकारण आणू इच्छित नाही. राजकीय मतभेद असतील तर ते सर्वांनी बाजूला ठेवले पाहिजे. पण अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनची चर्चा सुरू होती त्यावेळी आमचे म्हणणे होते की याऐवजी राज्याच्या राजधानीला उपराजधानीशी जोडणारी बुलेट ट्रेन राज्यासाठी उपयोग होईल.