Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रजिल्हा बँकेत केंद्राचा हस्तक्षेप वाढला सहकार विभागामार्फत न्यायालयात जाणार -अजित पवार

जिल्हा बँकेत केंद्राचा हस्तक्षेप वाढला सहकार विभागामार्फत न्यायालयात जाणार -अजित पवार


बारामती (रिपोर्टर)- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये केेंद्र सरकारने अनेक बदल केले असून केंद्र सरकारकडून जिल्हा बँक चालवण्याचा अधिकार काढला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. केंद्र सरकारच्या या हस्तक्षेपाविरोधात सहकार विभागामार्फत न्यायालयात जाणार असल्याचे सांगून केंद्र सरकारने सहकार खात्याची निर्मिती केवळ राज्यातील सहकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्यासाठीच केल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा बँक चालविण्याचा अधिकार काढून अध्यक्ष आणि संचालक निवडीमध्येही केंद्राने हस्तक्षेप वाढवल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

ते आज बारामती येथे एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. गेल्या काही दिवसांपुर्वी केंद्र सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि या विस्तारामध्ये सहकार खातं नियुक्त करून त्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे दिली. तेव्हाच राज्या राज्यात आणि केेंद्रात सहकार खात्यावरून वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. केंद्राने नुसते खातेच तयार केले नाही तर सहकार संस्थांमध्ये हस्तक्षेप करणेही सुरू केल्याचे दिसून येते. म्हणूनच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी भाष्य केले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यातील सहकारी संस्थांमध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे आता अडचणी निर्माण होत आहेत. काही नवीन प्रश्‍न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकारने सहकारमत्र्ये नवीन बदल केले आहेत. त्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, या निर्णयात जिल्हा बँक चालविण्याचे अधिकार काढून घेतले आहेत. अध्यक्ष आणि संचालक बदलामध्येही केंद्राचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे सर्व पाहता केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यातील सहकार क्षेत्र आणि बँका आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात वकिलांचा सल्ला घेत सरकारच्या वतीने सहकार विभागामार्फत न्यायालयात जाणार आहोत, असेही अजित पवारांनी या वेळी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!