Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडधारूरच्या घाटात कंटेनर कोसळला,चालक ठार आज सकाळी घडली घटना

धारूरच्या घाटात कंटेनर कोसळला,चालक ठार आज सकाळी घडली घटना


धारूरचा घाट मृत्युचा सापळा बनला
धारूर (रिपोर्टर):- धारूरच्या घाटामध्ये सातत्याने अपघात होत आहेत. घाटातील रस्ता अरूंद असल्याने अपघात होत आहे. रस्ता रूंद करण्याची वेळोवेळी मागणी करण्यात आली. मात्र याकडे संबंधित प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात. आज सकाळी 9 वाजता केजहून परभणीकडे निघालेला कंटेनर घाटात कोसळल्याने चालक ठार झाला. घटनास्थळी धारूर पोलीस दाखल झाले होते.


धारूरच्या घाटामध्ये सतत अपघात होतात. रस्ता रूदं करण्यासंदर्भात अनेक वेळा संबंधित विभागाकडे मागणी करण्यात आली. मात्र रस्ता रूंद काही झाला नाही. आज सकाळी केजहून परभणीकडे निघालेला कंटेनर क्र.एम.एच.12 यु.4090 हा दरीत कोसळला. यामध्ये पटेल नावाचा 43 वर्षीय चालक गंभीररित्या जखमी होवून ठार झाला. हा चालक कर्नाटक येथील असल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती धारूर पोलीसांना झाल्यानंतर एपीआय पाटील आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले होते.

Most Popular

error: Content is protected !!