बीड (रिपोर्टर)- कोरोनाचा संसर्गसध्या कमीच आहे. सणासुदीच्या दिवसात नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन वेळोवेळी प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यापासून रुग्णांची संख्या कमी-जास्त प्रमाणात होत आहे. आज आलेल्या अहवालात फक्त 39 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील माजलगाव, परळी, धारूर आणि गेवराई या तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने समाधान व्यक्त होत आहे.
राज्यभरामध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमीच आहे. तिसर्या लाटेचा धोका पाहता राज्य सरकारने प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. सणोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरे करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांनी खरेदी-विक्री करताना गर्दी करू नये, असेही शासनाचे आदेश आहेत. बीड जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या कमी-जास्त होत असून गेल्या एक महिन्यापासून जिल्हाभरात रुग्णसंख्या घटलेली आहे. आज आलेल्या अहवालात फक्त 39 रुग्ण आढळून आल्याने समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील माजलगाव, परळी, धारूर आणि गेवराई या तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. एकूण 1 हजार 928 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात 1 हजार 889 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अंबाजोगाई 3, आष्टी 12, बीड 9, केज 2, पाटोदा 9, शिरूर 1 आणि वडवणी 3. इतर तालुक्यातही रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली असून रुग्णसंख्या अशीच कमी झाल्यास कोरोनावर नक्कीच विजय मिळवता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.