Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमकर्जबाजारी शेतकर्‍याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

कर्जबाजारी शेतकर्‍याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या


खासगी लोकांचे होते पैसे; अतिरिक्त
पावसाने पीक गेले वाहून, चिठ्ठीमध्ये
लिहिलं मुला-बाळांचा सांभाळ करा

बीड/कुक्कडगाव (रिपोर्टर):- अतिरिक्त पावसामुळे शेतीतील पीक वाहून गेले, डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून एका तरूण शेतकर्‍याने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रात्री राक्षसभुवन (देवीचे) येथे घडली. आत्महत्या करण्यापुर्वी शेतकर्‍याने चिठ्ठी लिहिली, मुला-बाळांचा सांभाळ करा असा उल्लेख चिठ्ठीमध्ये असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पिंपळनेर पोलीसांनी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला.


बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. पंधरा दिवसपूर्वी अतिरिक्त पाऊस झाला, या पावसामुळे खरीप पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राक्षसभुवन येथील अशोक व्यंकटेश मस्के (वय 35) या शेतकर्‍याला अडीच एक्कर जमीन आहे. त्याने कापसाची लागवड केली होती. अतिरिक्त पावसाने त्याचे पुर्णत: पीक वाहून गेले. या शेतकर्‍याकडे खासगी लोकांचे पैसे होते, शेतीतील पीक वाहून गेल्यान लोकांचे पैसे कसे द्यायचे या चिंतेतून शेतकर्‍याने रात्री राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शेतकर्‍याने चिठ्ठी लिहून ठेवली. माझ्या मरणानंतर मुला-बाळांचा सांभाळ करावा असा उल्लेख चिठ्ठीमध्ये असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती पिंपळनेर पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. चिठ्ठी पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

Most Popular

error: Content is protected !!