Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडआरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय राज्यात निवडणूका घेवू नका

आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय राज्यात निवडणूका घेवू नका


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बीड (रिपोर्टर):- स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण रद्द केले असून या आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय महाराष्ट्र राज्यात निवडणूका घेवू नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सदरील हे आंदोलन प्रा.सुशिला मोराळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत केल्याशिवाय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेवू नयेत, ओबीसींची जातनिहाय जनगणना केंद्र व राज्य सरकारने त्वरित करावी. इटेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा. राज्य मागासवर्गीय आयोगास त्वरित निधी उपलब्ध करून देण्यता यावा यासह इतर मागण्यासाठी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. सदरील हे आंदोलन प्राध्यापक सुशिला मोराळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून यावेळी देविदास चव्हाण, बबन आंधळे, गणेश ढाकणे, रवि शेरकर, वैजीनाथ शिंदे, लक्ष्मण गुंजाळ, अर्जुन दळेल, संदिप उपरे, बाळु पवार, संजय गुरव, संदिप बेद्रे, मोहन आघाव, रोहिदास जाधव, मोहन जाधव, वाघमारे सुधाकर, पठाण अमरजान यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!