Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमपरिवहन अधिकार्‍याला धक्काबुक्की ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल

परिवहन अधिकार्‍याला धक्काबुक्की ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर):- जिल्हाधिकारी यांनी आरटीओ कार्यालयासाठी घोसापुरी शिवारात दिलेली जमीन पाहण्यासाठी गेलेल्या उपप्रादेशीक परिवहन अधिकार्‍याला त्या जागेवर अतिक्रमण केलेल्या लोकांनी धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी परिवहन अधिकारी जयंत रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांनी घोसापुरी शिवारात कैलासगडाच्या पायथ्याशी आरटीओ कार्यालयासाठी 32 एक्कर जमीन दिलेली आहे. त्या जमिनीची पाहणी करण्यासाठी काल उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयंत रमेश चव्हाण हे गेले असता त्या जागेवर अतिक्रमण केलेल्या भारत लक्ष्मण कानडे यांनी त्यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा केला. या प्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भारत कानडे यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 353, 143, 147, 149, 504, 506 भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!