Friday, January 28, 2022
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर-बलात्कार आणि समाजव्यवस्था

प्रखर-बलात्कार आणि समाजव्यवस्था

बलात्कार ही समाजात असलेली विषारी वृत्ती आहे, ही वृत्ती उखडून टाकण्याचं काम व्हायला हवं. आपल्या मुलांना आपण किती चांगले संस्कार देतोत यावर बरच काही अवलंबून आहे. पुण्यात जी घटना घडली, त्या घटनेत बलात्कारी रिक्षा चालवणारे आहेत, त्यांचे वय तीस वर्षाच्या पुढे होते, एका चौदा वर्षाच्या मुलीवर हे नराधम दोन दिवस बलात्कार करत होते, ही किती शरमेची बाब आहे. या नराधमांच्या घरी महिला, मुली नाहीत का? लहान,लहान मुली पळवून नेवून त्यांच्यावर अत्याचार केले जातात. मुली पळवण्याच्या घटनेत वाढ झाली. आपला मुलगा काय करतो, तो किती वाजता घरी येतो. तो काम काय करतो. वाईट संगतीला तर लागला नाही ना? याकडे आई-वडीलाचं लक्ष असायचं हवं. घरातूनच मुलांना चांगले संस्कार मिळायला हवे.

जगात आज ही माणुसकीला काळीमा फासणार्‍या क्रुर घटना घडतात. अशा घटना रोखण्यास शासन, प्रशासन आणि समाजाला अजुन यश येत नाही. महिला विविध अधिकारपदावर आहेत, पुर्वी महिलांना अधिकार नव्हते. मात्र काही महापुरुषांनी महिलांच्या अधिकारासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं, संसार खुंटीला बाधून ठेवला, पण महिलांना न्याय मिळवून दिला! प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत, असं कोणतही क्षेत्र नाही तिथं महिला नाही. असं असतांना महिलाकडे पाहण्याचा लोकांना दृष्टीकोन बदलला नाही. अनेक ठिकाणी महिलांची कुचंबना होते. तिच्यावर अन्याय, अत्याचार होतो, हे सगळं थांबवण्यासाठी शासनाने विविध कायदे केलेले आहेत. महिलांच्या बाबतीत कठोर कायदे असले तरी महिलांवरील अत्याचार थांबले नाही. गुजरातच्या दंगलीत अनेक महिलांवर बलात्कार झाले. नराधमांनी गर्भवती महिलांवर देखील अत्याचार करुन आपलं राक्षसीरुप दाखवलं होतं. दिल्लीच्या ‘निर्भया’ प्रकरणी अवघा देश पेटून उठवला होता. निर्भयावर अत्याचार करुन तिची अंत्यत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. कोपर्डीची घटना ही भयानक होती, त्यानंतर देशात अशा अनेक घटना घडल्या. घटना घडल्यानंतर समाज रस्त्यावर येतो. नराधमांना तात्काळ शिक्षा द्या, म्हणुन मागणी करतो. काहींची मागणी असते, नराधमांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देतोत. काही म्हणत असतात. भरचौकात फाशी द्या, हैद्राबाद येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने अवघा देश सुन्न झाला होता. या प्रकरणातील नराधमांचे एन्काउंटर करण्यात आले होते. तरी ही बलात्कार थांबले नाहीत.
पुढार्‍यांची मानसीकता
समाजात घडणार्‍या वाईट घटना बाबत चर्चा होत असतात. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आरोप,प्रत्यारोप होत असतात. ज्या पक्षाची सत्ता आहे. त्या पक्षाला एखादी घटना घडल्यानंतर सारवासारवी करावी लागत असते. तुमच्या राज्यात काय चाललयं असा प्रश्‍न विरोधक विचारत असतात. विरोधक जेव्हा सत्तेवर येतात. तेव्हा ते गुपचुप असतात. राजकारण कुणीच करु नये असं ते सांगत असतात. घटना कोणतीही असो. त्याचं समर्थन करता कामा नये, पण राजकीय पुढारी आपल्या बगलबच्चांना वाचण्यासाठी काही घटनाचं समर्थन करत असतात, मग ते समर्थन छुपे असेल किंवा उघड असेल. कठुओची घटना घडल्यानंतर आरोपीला वाचवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. बलात्कार्‍यासाठी मोर्चा काढणारे किती सुज्ञान म्हणायचे. ‘ती’ मुलगी अल्पसंख्याक जातीची होती, म्हणुन आरोपीला वाचवण्याचा खटाटोप होता का? हाथरशची घटना तर किती दुर्देवी होती, मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिचे अंत्यसंस्कार पोलिसांनी परस्परच केले. एखादा माजी मुख्यमंत्री महिला मंत्र्यांना ‘आयटम’ असा उल्लेख करतो. अशा पुढार्‍याच्या मानसीकतेला काय म्हणायचं? कुणी सैनिकांच्या महिला बाबत हिडीस वक्तव्य करतो. सैनिक वर्षभर सिमेवर लढतो आणि त्याला इकडे गावात मुलगा होतो आणि हा तिकडे पेढे वाटतो. ‘ज्या मुलीवर तुमचं प्रेम आहे, तिला पळवून आणा मी मदत करतो’ असं एक पुढारी म्हणतो. नुकतचं एका भाजपाच्या पुढार्‍याने वक्तव्य केलं की, रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष, यासह अनेक वक्तव्य देशातील विविध पक्षाच्या पुढार्‍यांचे आहेत. पुढार्‍यांचीच महिलांच्या बाबतीत ही मानसीकता असेल तर अवघड आहे. एकीकडे समाज,महिला सुधारणेच्या गप्पा मारायच्या दुसरीकडे आपले आतील खरे रुप दाखवायचे, नीत्तीमत्ता, विचार हे किती पुढार्‍यांच्या अंगी आहेत, याचं आत्मचिंतन आजच्या पुढार्‍यांनी करायला हवे.
भारत आणि इंडीया
महिला अत्याचाराला काही जण वेगवेगळे विश्‍लेषणं लावून त्यावर चर्चा करत असतात. महिलांचे राहणीमान बदललं. महिला कमी कपडे घालतात. त्यामुळे त्यांच्यावर बलात्कार होतात, असं काही विचारहीन लोकाचं मत असतं, याबाबत भारत आणि इंडीया असा फरक ते करत असतात. इंडीयातील मुली, महिला, मॉडेलींग पध्दतीने राहतात. त्यामुळे त्यांच्यावर बलात्कार होतात असा जावाई शोध काहींचा असतो. भारतातील महिला, मुली साध्या पध्दतीने राहतात. त्यामुळे त्या सुरक्षीत असतात. इंडीया आणि भारतात ही बलात्कार होतात याचा विचार ही मंडळी का करत नाही? हाथरसची घटना भारतातील आहे, ही मुलगी शेतात काम करत होती, तिच्यावर काही नराधमांची बलात्कार केला. त्यानंतर तिला क्रुरपध्दतीने मारहाण करण्यात आली. कठुओची घटना ही भारतातीलच होती, ती तर अल्पवयीन मुलगी होती, तीला समाजा बाबतचं कसलही ज्ञान नव्हतं. लोक चांगले की, वाईट याचा बिलकुल गंध नव्हता. ती शेतात शेळ्या राखण्याचं काम करत होती. तिच्यावर नराधमांची नजर गेली. अत्याचार करुन तिला संपवण्यात आलं. बलात्कार करणार्‍या नाराधमी वृत्तीचे लोक फॅशनेबल राहणार्‍या आणि सर्वसामान्य असा फरक करत नाही. ज्यांचे वय अगदी लहान आहे. अशा चिकुमलीवर अत्याचार होतात याला काय म्हणाचयं? अशा घटनात कोणता फरक करणार? वयोवृध्द महिलांवर देखील बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. कौटुंबीक बलात्कार काही कमी नाहीत? घरातील विधवा, घटस्फोटीत व इतर महिलांवर कुटूंबातील व नात्यातील लोक अत्याचार करत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. तसे गुन्हे देखील दाखल झालेले आहे. काही प्रमाणात गुन्हे दाखल होत नाही, कारण कुटूंबातील लोक अत्याचारीत महिलांवर दबाव टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असतात. घरातील अत्याचारा बाबत कोण आवाज उठवणार? पुरुषी अहंकार आणि नराधमी वृत्ती याला कारणीभूत नाही का? पडद्यात असणार्‍या महिलांवर बलात्कार होत नाहीत का? बलात्कार ही एक वाईट मानसीकता आहे. अशा मानसीकेचं कधीच समर्थन होवू शकत नाही. महिला, मुली ’तशा’ आहेत. म्हणुन त्यांच्यावर अत्याचार वाढले आहेत. हा जो बुरसटलेला विचार काही लोक करतात अशा लोकांच्या बुध्दीची कीवच करावी वाटते. त्यांनी आधी समाज व्यस्थेचा अभ्यास करावा नंतर याबाबत मत व्यक्त करायला हवं.
बलात्काराच्या घटनेत दहा राज्य
दरवर्षी बलात्काराच्या घटनेत वाढच होत आहे. नॅशनल रेकॉडर्स ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,महाराष्ट्र, केरळ, आसाम, हरियाना, झारखंड, ओडिशा आणि दिल्ली या दहा राज्यात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडत आहेत. गेल्या दहा वर्षात या 10 राज्यात बलात्काराच्या एकूण घटनाची संख्या दुप्पट झाली आहे. यात 2009 मध्ये 12,772 वरुन 2019 मध्ये 23,173 घटना इतकी वाढ झाली आहे. देशातील उर्वरित 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या दहा वर्षात बलात्काराच्या घटनामध्ये काही विशेष बदल झालेला नाही. देशात सगळ्यात वाईट परस्थिती राजस्थानची आहे. सर्वात जास्त महिलांवर राजस्थानमध्ये अत्याचार होतात. दुसर्‍या क्रमांकवर केरळ आहे. महिलासाठी तिसरे सर्वात असुरक्षीत राज्य म्हणजे दिल्ली आहे. हरीयाणा, झारखंड,उत्तरप्रदेश या राज्यात बलात्काराच्या घटनेत वाढच झालेली आहे. ज्या दहा राज्यात बलात्काराच्या घटनेत वाढ झाली आहे. तेथील राज्य सरकार नेमकं काय करतयं या बाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. राज्यकर्त्यांनी आपलं राज्य स्वच्छ करण्याचा निर्धार केला पाहिजे. फक्त हातात झाडू घेवून देश स्वच्छ होत नसतो, याचाही विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. अत्याचार रोखण्याची तितकीच जबाबदारी राज्यकर्त्यांची असते.
आपली समाज व्यवस्था
बलात्कार हा समाज व्यवस्थेशी निगडीत आहे. एखाद्या महिलेस, मुलीस आयुष्यातून उठवणं आणि तिचं जीवन बरबाद करणं हा अधिकार कोणालाच नाही. महिला आहे म्हणुन तिच्याकडे वाईट नजरने पाहणे हे मोेठे पापच आहे. प्रत्येकांच्या घरात महिला, मुली असतात, याचा विचार केला पाहिजे. महिला, मुलीच्या बाबत अनेक जण कमेंट करत असतात. सोशल मीडीयातून अशी विकृती नेहमीच दिसून येत असते. महिलांची रस्त्याने छेडछाड होत असते. कित्येक महिला, मुलींनी आता पर्यंत छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. महिलांचे संरक्षण करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली जाते, पण यातून काही साध्य होतं नाही. जेव्हा माणुस घराच्या बाहेर पडत असतो. तेव्हा तो नजर झुकवून, म्हणजे महिला, मुलींचा आदर करतो का याचं आत्मचिंतन व्हायला हवं. कौटूंबीक आणि समाजीक परस्थिती बदलण्यासाठी अध्यात्मिक कायर्र्क्रम, प्रशिक्षण शिबीरे घेतली जातात. व्याख्याने आयोजित केले जातात, पण यातून समाज तितका सुधारत नसल्याचे दिसून येते. काही थोडेच लोक विचाराची कास धरुन असतात. त्यांना समाजाची जाण असते, चांगलं आणि वाईट याचं भान असतं. महिला मुलीवरील अन्याय, अत्याचाराच्या बाबतीत सुज्ञ लोक आवाज उठवत असतात. अत्याचार प्रकरणात जाती,पातीला थारा असता कामा नये, जेव्हा महिला, मुलीवर अत्याचार होतो. तो अत्याचारच असतो. त्यात जात, पात, धर्म येता कामा नये, काही प्रकरणात ती आमक्या जातीची आहे म्हणुन आपल्याला काय देणं-घेणं असा विचार करणारे महाभाग कमी नाहीत. जात, धर्म पाहून महिला, मुलीवर अत्याचार होत नाही. ती महिला, मुलगी आहे म्हणुनच तिच्यावर नराधम वृत्तीचे लोक अत्याचार करतात. बलात्कार ही समाजात असलेली विषारी वृत्ती आहे, ही वृत्ती उखडून टाकण्याचं काम व्हायला हवं. आपल्या मुलांना आपण किती चांगले संस्कार देतोत यावर बरच काही अवलंबून आहे. पुण्यात जी घटना घडली, त्या घटनेत बलात्कारी रिक्षा चालवणारे आहेत, त्यांचे वय तीस वर्षाच्या पुढे होते, एका चौदा वर्षाच्या मुलीवर हे नराधम दोन दिवस बलात्कार करत होते, ही किती शरमेची बाब आहे. या नराधमांच्या घरी महिला, मुली नाहीत का? लहान,लहान मुली पळवून नेवून त्यांच्यावर अत्याचार केले जातात. मुली पळवण्याच्या घटनेत वाढ झाली. आपला मुलगा काय करतो, तो किती वाजता घरी येतो. तो काम काय करतो. वाईट संगतीला तर लागला नाही ना? याकडे आई-वडीलाचं लक्ष असायचं हवं. घरातूनच मुलांना चांगले संस्कार मिळायला हवे. घर चांगलं संस्कारी असेल तरच समाजात वाईट घटना घडणार नाही. बलात्कार रोखण्यासाठी कितीही कठोर कायदे केले, बलात्कार्‍यांना मारलं काय आणि जिवंत ठेवलं काय, यामुळे बलात्कार थोडेच कमी होणार? कायदा कठोर असावा यात काही शंका नाही. त्याचा तितका धाक ही असायला हवा, पण कायद्याचा धाक किती प्रमाणात आहे? कायद्याचा धाक असता तर देशात रोज 91 बलात्काराच्या घटना घडल्या नसत्या. समाज व्यवस्था सुधारण्यासाठी माणसं सुधारीत होणं गरजेचं आहे. अरे माणसा, माणसा कधी होसील तु माणुस, असं म्हण्याची वेळ आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!