Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडवडवणीकष्टाने आणि घामाने पिकवलेल्या उसाचे बिल एक रकमी द्या - भाई गंगाभीषण...

कष्टाने आणि घामाने पिकवलेल्या उसाचे बिल एक रकमी द्या – भाई गंगाभीषण थावरे


वडवणी (रिपोर्टर):-शेतकर्‍यांनी पिकवलेल्या ऊस पिकाचे बिल हे चार विभागात न देता एक रक्कमी देण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी चिंचवण या ठिकाणी ऊस परिषेद घेऊन भाई गंगाभीषण थावरे यांनी मागणी केली आहे.तर सदरील परिषेदमध्ये शेतकरी हिताचे एकूण पाच निर्णय घेण्यात आले आहे.

वडवणी तालुक्यातील मौजे चिंचवण याठिकाणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.तर या परिषेदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सोमनाथ बडे, बालासाहेब बडे, शेख समशेर भाई, शेख अब्बास भाई, शेख जावेद भाई, इंद्रसेन कोठूळे, शेख बाबू, राम पुरे, दत्तू पुरे,रंगनाथ बडे, विष्णू डोंगरे, महादेव महाराज खोटे, चंद्रकांत पाटील, शिवाजी मुंडे, राजेंद्र घुले,बिबीशन डोंगरे, दिलीप नांदे, मयूर बडे, दीपक यादव, नितीन साळवे, बापूराव तांबडे, शेख युसुफ, अमृत नानवर, अंगद बडे, ईश्वर तांबडे, मयूर बडे, विक्रम बडे, सखाराम नानवर, अंकुश नानवर, नारायण बर्डे, शिवलिंग पायगुडे, संभाजी कोठुळे, दशरथ दोडताले ,परमेश्वर तांबडे, गोरख बडे आदि जण उपस्थित होते.तर ऊसाची रक्कम एकरक्कमी देण्यात यावी,बाहेर जिल्ह्यातील ऊस जिल्ह्यातील कारखान्यांनी आणू नये,पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे बीड येथे हि ऊसदर देण्यात यावा,ऊसतोडणी व वाहतुकीच्या इन्ट्रीवर नियंत्रण असावे,पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयातील ऊस विकास अधिकारी पांडुरंग शेळके नावाचा अधिकारी शेतकरी प्रतिंनिधी यांना व्यस्थित बोलत नसल्याने यांना निलबीत करण्यात यावे असे एकूण पाच ठराव घेऊन ऊस उत्पादक शेतकर्याच्या प्रश्नाला वाचा फोडली असून शेतकरी राजा शेतात काबाड कष्ट आणि घाम गाळून ऊस पिकावत आहे.ऊस कारखान्यावर घातल्या नंतर चार विभागात बिल देत असून हि कुचबणा त्वरित थांबवणी आणि ऊसाचे बिल एक रक्कमी देण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.या परिषेदेला वडवणी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!