Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडबीड तहसीलच्या पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार

बीड तहसीलच्या पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार


सहा महिन्यांपासून राशन कार्ड ऑनलाईन करणे बंद तर पुरवठा विभागाला कुलूप
बीड (रिपोर्टर)- बीडचे तहसीलदार शिरीष वमने हे नेहमीच आपल्या मगरुर कामामुळे वादग्रस्त ठरतात. तहसीलमधल्या केशरी राशन कार्डचा मेळ लागत नसतानाच गेल्या सहा महिन्यापासून राशन कार्ड ऑनलाईन करणे बंद झालेले आहे. तर तहसीलच्या पुरवठा विभागाला गेल्या चार दिवसांपासून चक्क कुलूप लावण्यात आलेले आहे.


शिरीष वमने हे प्रशिक्षण कालावधीतही राज्याचे महसूल प्रशासन माझ्या पाठिशी आहे, त्यामुळे मी काहीही केले तर चालते, तत्कालीन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी तर वमने यांना डोक्यावर घेतल्यामुळे ते आपला कारभार मगरुरीने हाकतात. गेल्या सहा महिन्यांपासून राशन कार्ड ऑनलाईन करणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे राशन कार्ड ऑनलाईन करण्यात आलेले नाही अशा शिधापत्रिका लाभधारकांना धान्य मिळत नाही. गेल्या चार दिवसांपासून बीड शहरातील श्रीमती हिना बेगम हकीम या एका खासगी दवाखान्यात शस्त्रक्रियेसाठी दाखल असून त्यांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा फायदा मिळण्यासाठी तहसीलदार यांचे पुरवठा विभागासंदर्भातील प्रमाणपत्र हवे आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून बीडच्या तहसील येथील पुरवठा विभागाला कुलूप लावल्यामुळे या दाखल असलेल्या महिलेचे नातेवाईक सकाळी तहसीलमध्ये येतात आणि संध्याकाळ चार वाजेपर्यंत कार्यालय उघडण्याची वाट बघतात तरीही तहसीलदार वमने यांना घाम फुटत नाही. या सर्व बाबींची जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावी आणि वमने यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!