Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकारी, दोन तहसीलदारांच्या बदल्या

जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकारी, दोन तहसीलदारांच्या बदल्या

धरमकर हिंगोलीला तर आघाव पाटील वाशिमला
बीड (रिपोर्टर)- राज्य सरकारने काल महसूल अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून बीड महसूल विभागातील तीन उपजिल्हाधिकारी आणि दोन तहसीलदार यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बीड येथेच कार्यरत असलेले उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धरमकर यांची हिंगोली येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली तर नेहमीच चर्चेत असलेले सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांची वाशिम येथे रोजगार हमी उपजिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी मंजुषा बाफणा यांची माजलगावच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. पाटोदा आणि माजलगाव या दोन तहसीलदारांच्या बदल्याही जिल्ह्याबाहेर करण्यात आलेल्या आहेत.

आपल्या प्रशासकीय कारकिर्दीतील जवळपास 7 ते 8 वर्षे बीड येथेच कार्यरत असलेले निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांची हिंगोली येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. धरमकर यांनी बीड येथे दोन टप्प्यात काम केलेले आहे. निवडणूक काळात 9 कोटींच्या मंडपावर केलेल्या खर्चावरून ते वादग्रस्त ठरले होते. इनामी जमीन प्रकरणी आघाव पाटीलही चर्चेत आले होते. त्यांचीही वाशिम येथे रोजगार हमीच्या उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे तर माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांची गंगापूरला अकार्यकारीपदावर बदली करण्यात आली आहे. तर पाटोदा येथील तहसीलदारही जिल्हाबाहेर बदलून गेले आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकार्‍यांच्या जागेवर अद्याप कोणत्याही अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

Most Popular

error: Content is protected !!