Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडपोलीस दलातील चालक भरतीसाठी शहरातील दहा सेंटरवर लेखी परीक्षा

पोलीस दलातील चालक भरतीसाठी शहरातील दहा सेंटरवर लेखी परीक्षा


३६ जागांसाठी ३ हजार २६० परीक्षार्थी; कागदपत्र नसणार्‍या परीक्षार्थ्यांना बाहेर काढले
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये पोलीस दलात चालकाच्या ३६ जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. ३ हजार २६० जण पात्र ठरल्याने या पात्र परिक्षार्थींची आज बीड शहरातील १० सेंटरमध्ये परीक्षा घेण्यात आली. ज्या परीक्षार्थ्याकडे कागदपत्र नव्हते अशांना बाहेर काढण्यात आले. सदरील परीक्षार्थींनी वादावादी निर्माण करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र परीक्षाच्या नियमानुसार कागदपत्र नसणार्‍यांना आतमध्ये बसू देण्यात आले नाही. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


२०१९ साली जिल्हा पोलीस दलाने चालकाच्या ३६ जागांसाठी अर्ज मागवले होते. त्यामध्ये ३ हजार २६० जण पात्र ठरले होते. परीक्षार्थीच्या आज बीड शहरातील बलभीम महाविद्यालय, केएसके, शिवाजी विद्यालय, इंदिरा गांधी विद्यालयसह १० सेंटरमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरूवात झाली. यामध्ये काही परीक्षार्थ्याकडे कागदपत्र नसल्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. अशा परीक्षार्थींनी अकांड तांडव करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या या अकांड तांडवाला परीक्षा विभागाच्या अधिकार्‍यांनी भीक घातली नाही. नियमानुसार कागदपत्र बाळगणे गरजेचे असतांना कागदपत्र बाळगले नसल्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. दरम्यान प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उमेदवारांनी पोलिस अधिक्षकांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!