Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमवाहकास मारहाण करून लुटले ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

वाहकास मारहाण करून लुटले ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर)- नामलगाव ब्रिजच्या खाली चारचाकीमध्ये बसलेल्या वाहकास चौघा जणांनी गाडीच्या खाली खेचून जबर मारहाण करत गळ्यातील सोन्याची चैन व एक आंगठी बळजबरीने हिसकावून घेतल्याची घटना काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी चौघा जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णांत जनार्धन कुंभार (वय ३६, रा. बेलवडे हवेली ता. कराड) हे परिवहन महामंडळात वाहक म्हणून नोकरी करतात. ते काल लायसेन्स रिन्यू करण्यासाठी त्यांच्या चार मित्रांसह बीड येथील आरटीओ कार्यालयात आले होते. त्यांचे तीन मित्र आरटीओ कार्यालयात लायसेन्स रिन्यू करण्यासाठी गेले होते. या वेळी कुंभार हे आपली चारचाकी गाडी (क्र. एम.एच. ४४ एच. के. ६७९७) ही नामलगाव ब्रिजच्या खाली लावून झोपले होते. त्यावेळी अज्ञात चौघांनी तेथे येऊन त्यांना बळजबरीने गाडीच्या खाली खेचून त्यांना जबर मारहाण करत त्यांच्या गळ्यात असलेली एक तोळ्याची चैन व एक तोळ्याची अंगठी काढून घेतली. अशा आशयाची फिर्याद त्यांनी ग्रामीण ठाण्यात दिली असून या प्रकरणी अज्ञात चौघा जणांविरोधात मारहाण करून लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे करत आहेत.


गैरसमजातून घडला प्रकार
दरम्यान, एका स्कॉर्पिओने दुसर्‍या स्कॉर्पिओला कट मारल्याचा प्रकार जालना रोडवरील हॉटेल द मिलन एक्सक्लूसिव्हसमोर घडला होता. त्यावेळी दोघात बाचाबाची झाली होती. त्यानंतर बीडमधून एकाने आपले मित्र घेऊन त्या स्कॉर्पिओ चालकाला मारण्यासाठी नामलगावकडे जात असताना त्यांना कुंभार यांची स्कॉर्पिओ दिसली त्यांना वाटले याच चालकाने आपल्याला कट मारला आहे, त्यामुळे कुंभार यांनी चौघांना बेदम मारहाण केली. मात्र सोने लुटले नाही ते सोने झटापटीत खाली पडलं होतं. ते रात्री उशीरा फिर्यादीला सापडल्याचे कळते. एकूण हा प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे समोर येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!