यांनी केले होते चित्रीकरण
दिल्ली (वृत्तसेवा): गेले साडेपाच महिने राज्यसभेतून निलंबीत असलेल्या काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांचे निलंबन अखेर मागे घेण्याच्या निर्णायक हालचाली उच्च पातळीवर सुरू झाल्या असून पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात तसा सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असे वरिष्ठ सभागृहाच्या सुत्रांनी सांगितले. त्यासाठी सभागृहाच्या विशेष अधिकार समितीची बैठक बोलवण्यात आली आहे.
रजनीताई पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रपती अभिभाषणावर चर्चेस उत्तर देण्याच्या भाषणावेळी सभागृहात सुरू असलेल्या गोंधळाचे व्हिडिओ चित्रण केले, ते सोशल मिडियावरही व्हायरल झाले. नंतर भाजप खासदार जी.व्ही.एल. नरसिंहराव यांनी पाटील यांच्याबद्दल त्वरीत तक्रार केली व अर्थसंकल्पीय अधिवेशनात 10 फेब्रुवारी रोजी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गेली दोन अधिवेशने त्या सभागृहाबाहेर आहेत. पाटील यांना निलंबीत करण्याचा निर्णय राज्यसभा सभापतींनी घेतला होता. राज्यसभाचे सभापती जगदीश धनगड हे पाटील यांचे निलंबन मागे घेण्याबाबत याच आठवड्यात निर्णय घेऊ शकतात, असे सुत्रांनी सांगितले.