Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeदेश विदेशमुलींना याच वर्षीपासून ‘एनडीए’मध्ये प्रवेश द्या सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश!

मुलींना याच वर्षीपासून ‘एनडीए’मध्ये प्रवेश द्या सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश!


नवी दिल्ली (वृत्तसेवा)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधून केलेल्या भाषणात मुलींना एनडीएमध्ये प्रवेश देण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ ८ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये महिलांना एनडीएमध्ये घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचं सांगितलं होतं. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारने पुढील वर्षी मे महिन्यात महिलांना एनडीएच्या परीक्षांना बसता येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने त्यावर आक्षेप घेतला असून नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या छऊ- च्या परीक्षेमध्येच महिलांना बसण्याची परवानगी दिली जावी, असे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!