Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडहनुमान जगताप यांच्यावरील हल्ल्याचा मुख्य सुत्रधार शोधा शिवसेना पदाधिकार्‍यांचे एसपींना निवेदन

हनुमान जगताप यांच्यावरील हल्ल्याचा मुख्य सुत्रधार शोधा शिवसेना पदाधिकार्‍यांचे एसपींना निवेदन

बीड (रिपोर्टर):- शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांच्यावर हल्ला करणार्‍या काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी यातील अन्य आरोपींसह मुख्य आरोपीला तीन ते चार दिवसात जेरबंद करा, नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचे पदाधिकारी उपोषण करतील, असा इशारा हनुमान जगताप यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


आज सकाळी शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांना भेटले. या वेळी उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांच्या सहीनिशी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ला होऊन २० ते २२ दिवस उलटले असताना अद्यापपर्यंत यातील मुख्य आरोपीसह अन्य आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे माझ्या जिवीतास धोका आहे. आतापर्यंत दोन ते तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र मुख्य आरोपी अद्यापही राजरोसपणे मोकाट फिरत आहेत. तीन ते चार दिवसात आरोपींना अटक करा, या हल्ल्यामागचा मुख्य सुत्रधार कोण? तो शोधा, त्याच्या मुसक्या बांधा नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटण्यासाठी माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळुक, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, जिल्हा सचिव नितीन धांडे, संगीता चव्हाण, हनुमान जगताप यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनावर बीड जिल्ह्यातील बहुतांशी शिवसेना पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Most Popular

error: Content is protected !!