Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडपरळीशॉर्टसर्किटमुळे पौळ पिंपरीत १० एकर ऊसाची राखरांगोळी

शॉर्टसर्किटमुळे पौळ पिंपरीत १० एकर ऊसाची राखरांगोळी


पंचनामा करून महावितरणने नुकसानीची भरपाई
करावी; नुकसानग्रस्त शेतकर्‍याची मागणी

परळी (रिपोर्टर)-परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथील एका शेतकर्‍याचा तब्बल १० एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. सकाळच्या सुमारास शेतकरी गावात असतांना शेतातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट झाले आणि त्यामुळे आग लागली.


पौळ पिंपरी येथील शेतकरी बबन नरहरी पौळ आणि युवराज बालासाहेब पौळ या दोन शेकर्‍यांचा १० एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. ८ ते १० महिन्यांपूर्वी ऊसाची लागण केलेली होती. विद्यमान परिस्थितीत साखर कारखाने बंद आहेत. कारखाने बंद असल्याने या ऊसाचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान संभावित आहे. आतापर्यंत या शेतकर्‍यांनी तब्बल ५ ते ६ लाखांचा खर्च यावर केलेला असून, दत्तक बँकांचे कर्जही घेतलेले आहे. एवढा खर्च करून मुलाप्रमाणे जोपासलेल्या या पिकातून १५ ते १६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. संपूर्ण १० एकरवरील ऊसाचे पीक जळून खाक झाल्याने या शेकर्‍यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलीये. महसूल आणि कृषी विभागाने पंचनामा केला असून, महावितरणकडून कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. झालेल्या नुकसानीची पंचनामे करून भरपाई दिली जावी अशी अपेक्षा या शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!