Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमहसूल उपायुक्त शेतकर्‍यांच्या बांधावर

महसूल उपायुक्त शेतकर्‍यांच्या बांधावर


नागझरी, बागपिंपळगाव, पाडळसिंगी, हिरापूर शिवारातील बाधीत पिकांची केली पाहणी
गेवराई (रिपोर्टर)- पंधरा दिवसांपूर्वी मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे सुरुच असून आज औरंगाबाद विभागाचे महसूल उपायुक्त सुरेश बेदमुथ्था यांनी गेवराई येथील शेतीच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. एकही शेतकरी पंचनाम्यापासून चुकू नये अशा सक्तीच्या सूचना महसूल उपायुक्त संबंधित विभागाला दिल्या आहेत. अतिरिक्त पावसाने होत्याचं नव्हतं झालं. कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, तूर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सध्या पंचनामे सुरूच आहे. औरंगाबाद विभागाचे महसूल उपायुक्त सुरेश बेदमुथ्था हे बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून त्यांनी आज सकाळी गेवराई तालुक्यातील नागझरी, बागपिंपळगाव, पाडळसिंगी, हिरापूर येथील शेतांमध्ये जावून पिकांची पाहणी केली. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत एकाही शेतकर्‍याचा पंचनामा राहता कामा नये, अशा सूचना त्यांनी महसूल आणि कृषी विभागाला दिल्या. या वेळी त्यांच्या समवेत नायब तहसीलदार रामदासी, बुरांडे, पखाले, येवले, बावसकर, दांडगे, बोरडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!