अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई जिल्हा करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने हा मुद्दा पुन्हा आता उचलण्यात आला. आज सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रीत येऊन यशवंतराव चव्हाण चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. आंदोलनात सर्वच पक्षांचे नेते व र्कायकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अंबाजोगाई जिल्हा करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. यासाठी आतापर्यंत अनेक वेळा आंदोलन सुद्धा झालेले आहे. जिल्हा निर्मितीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याने शासनाने हा विषय तडीस न्यावा या प्रमुख मागणीसाठी अंबाजोगाईकर एकवटले आहेत. सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी यशवंतराव चव्हाण चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात नेत्यांसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.
सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन