Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमपत्नी-मुलीची हत्या करून मजुराने फाशी घेतली सिरसाळ्यात घडली दुर्दैवी घटना; घटनेचे कारण...

पत्नी-मुलीची हत्या करून मजुराने फाशी घेतली सिरसाळ्यात घडली दुर्दैवी घटना; घटनेचे कारण अस्पष्ट


सिरसाळा (रिपोर्टर)- कुटुंबातील सर्व सदस्य लग्नाला गेल्याने एका २८ वर्षीय मजुराने आपली पत्नी व दोन वर्षाच्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या करून स्वत: गळफास घेतला. ही दुर्दैवी घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना सिरसाळा येथील मोहा रोडवर घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी सिरसाळा पोलीस आणि ऍडिशनल एसपी दाखल झाले होते. मृतदेहांचे शवविच्छेदन अंबाजोगाई येथील रुग्णालयात करण्यात आले. या घटनेचे कारण दुपारपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. या प्रकरणी प्रथमदर्शनी आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली.

अल्लाहबक्श अहमद शेख (वय २८, रा. मोहा रोड, सिरसाळा) हा तरुण परळी थर्मल येथे वेल्डर म्हणून काम करत असे. गेल्या चार वर्षांपुर्वी त्याचे लग्न झाले होते. काल त्याच्या कुटुंबियातील सर्व सदस्य लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते त्यामुळे तो आणि त्याची पत्नी व दोन वर्षाची मुलगी घरी होते. रात्री उशीरा कुटुंबातील सदस्य लग्नाहून परत आल्यानंतर त्यांना अल्लाहबक्श याचे घर आतून बंद दिसून आले. आवाज दिल्यानंतर आतून कसलाही प्रतिसाद येत नसल्याचे पाहून काहींनी पत्रा उचकवून घरात उतरून पाहिले असता त्यांना अल्लाहबक्श हा फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळविल्यानंतर सिरसाळा ठाण्याचे एकलिंगे, सय्यद अर्शद, मिसाळ, देशमुख, पोकळे, मेंडके यांनी घटनास्थळी येऊन घर उघडले असता पलंगावर पत्नी शबनम (वय २५) आणि दोन वर्षाची अशफिया या दोघींचे मृतदेह आढळून आले. या दोघींची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती तर बाजुच्या रुममध्ये अल्लाहबक्श याने फाशी घेतली होती. प्रथम पत्नी आणि मुलीची हत्या करून नंतर अल्लाहबक्श याने आत्महत्या केल्याचे दिसून येते. सदरील हा प्रकार कशामुळे अल्लाहबक्श याने केला असावा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रथमदर्शी आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनास्थळी ऍडिशनल एस.पी. सुनिल लांझेवार यांनी भेट दिली. या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई रुग्णालयात पाठवून देण्यात आले होते. या घटनेने सिरसाळ्यासह परळी तालुक्णयात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!