Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडउद्या बीडमध्ये आरक्षण बचाव निर्धार मेळावा पुरवठामंत्री छगन भुजबळ, वडेट्टीवार मार्गदर्शन करणार

उद्या बीडमध्ये आरक्षण बचाव निर्धार मेळावा पुरवठामंत्री छगन भुजबळ, वडेट्टीवार मार्गदर्शन करणार


ओबीसी समाजाला आरक्षण केंद्र सरकारच देऊ शकतो – तायडे
बीड (रिपोर्टर)- सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केले असून हे आरक्षण केंद्र सरकारच देऊ शकतो, सध्या लोकसंख्यानुसार आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू आहेत मात्र आम्हाला लोकसंख्येनुसार नव्हे तर आमचे २७ टक्के आरक्षण हवे आहे. यासाठी आम्ही ओबीसी समाजाला जागृत करत आहोत. त्यासाठीच उद्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आरक्षण बचाव निर्धार मेळावा बीडमध्ये घेण्यात येणार आहे, या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री छगनराव भुजबळ हे करणार आहे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री विजय वडेट्टीवार हे करणार आहेत, अशी माहिती ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायडे यांनी दिली.
ते शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ओबीसी समाजासाठी अनेक चांगल्या योजना आहेत मात्र त्या योजनांची माहिती तळागळातील ओबीसींपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे ओबीसींसाठी असलेल्या अनेक राखीव जागांचा इतर जण फायदा गेत आहेत. आपल्याला राखीव असलेल्या जागांचा आपणच फायदा घ्यावा यासाठी झोपलेल्या ओबीसी समाजाला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करत आहोत. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे करणार असून मेळाव्याला पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार मार्गदर्शन करणार आहेत. यासह अन्य मान्यवरही मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती बबनराव तायडे यांनी दिली. दरम्यान या पत्रकार परिषदेला सुशिला मोराळे, अर्जुन दळे, जालिंदर करडकर, बाळासाहेब दहिफडे, संगीता चव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!