Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडव्हिस्टा गाडी डिवायडरवर धडकली दिलीप भोसलेंसह एक जण ठार

व्हिस्टा गाडी डिवायडरवर धडकली दिलीप भोसलेंसह एक जण ठार


मध्यरात्री घडली बाह्यवळणावर घटना; शोकाकूल वातावरणात सकाळी भोसलेंसह गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कार
बीड (रिपोर्टर)ः- अंबाजोगाईहून बीडकडे व्हिस्टा गाडीमध्ये येत असतांना बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या बाह्यवळणावरील डिवायडरवर व्हिस्टा जोरात धडकली. या अपघातात शिव अंगणवाडी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष दिलीप भोसले यांच्यासह अन्य एक जण ठार झाले. तर एकास गंभीर मार लागला. त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेने बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी शोकाकूल वातावरणात दिलीप भोसलेंसह गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

242708466 378680923930825 8918562222526573294 n


दिलीप भोसले यांच्या सासूवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना भेटण्यासाठी ते काल अंबाजोगाईला गेले होते. रात्री उशिरा ते अंबाजोगाईहून बीडकडे व्हिस्टा गाडी (क्रमांक एम.एच.२३ एन.५२७७) यामध्ये येत होते.

242740597 238215424927822 2044015645273241389 n

त्यांच्या सोबत महेंद्र गायकवाड आणि चंद्रकांत कांबळे हे दोघे होते. रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान त्यांची व्हिस्टा गाडी बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या बाह्यवळणावरील डिवायडरवर जोरात धडकली. या अपघातात दिलीप ज्ञानदेव भोसले (वय-५० वर्षे रा.संत कबीर नगर, महेंद्र सिताराम गायकवाड, (वय-४० वर्षे, रा.बार्शी रोड) हे दोघे जण ठार झाले. तर चंद्रकांत कांबळे रा.लक्ष्मण नगर बीड हे जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती होताच टोलनाक्यावरील रुग्णवाहीका त्याठिकाणी दाखल झाली. भागवत काळे, कल्याण देवडे, सिध्देश्‍वर मदने या तिघांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले होते. या दुर्देवी घटनेने बीड शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सामाजिक क्षेत्रात दिलीप भोसले यांचे मोठे योगदान

bhosle


दिलीप भोसले हे सामाजिक क्षेत्रामध्ये सतत कार्यरत असायचे. अंगणवाडी सेवीकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असायचा. यासाठी त्यांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. राज्य सरकारने अंगणवाडी सेवीकांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागले ते केवळ भोसले यांच्या आंदोलनामुळेच. भोसले यांचा जनसंपर्क दांडगा होता. सर्वच पक्षामध्ये त्यांचा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात होता. त्यांचे सामाजीक कार्य पाहता त्यांची शिवसेनेने शिव अंगणवाडी सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीला काही दिवसाचा कालावधी उलटला नाही तोच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भोसले कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!