Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमआरोग्य कर्मचारी रुग्णवाहिका चालक खोलेश्वर निर्मळ यांची आत्महत्या

आरोग्य कर्मचारी रुग्णवाहिका चालक खोलेश्वर निर्मळ यांची आत्महत्या


किल्ले धारूर (रिपोर्टर) धारूर शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिका चालक खोलेश्वर निर्मळ यांनी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थान मध्ये आत्महत्या केली आहे आत्महत्येचे कारण आणखी अस्पष्ट असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याविषयी सविस्तर माहिती अशी की शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिका वरील चालक खोलेश्वर निर्मळ वय ३५ वर्ष हे काल रुग्ण घेऊन बाहेर गावी गेले होते मध्यरात्री ते २ वाजता रुग्णालयात आले त्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे कर्मचारी निवासस्थान आहेत या ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली ते धारुर तालुक्यातील कारी गावचे राहणारे असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई-वडील असा परिवार आहे अतिशय शांत संयमी व सर्व रुग्णांना मदत करणारा कर्मचारी अशी त्यांची ओळख होती त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आत्महत्येचे कारण आणखी आस्पष्ट असुन पोलीस याचा तपास करत आहे.

Most Popular

error: Content is protected !!