Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडरस्त्याअभावी गंभीर जखमी महिलेला उचलून नदी करावी लागली पार

रस्त्याअभावी गंभीर जखमी महिलेला उचलून नदी करावी लागली पार


गेवराई : (रिपोर्टर) पिसाळलेल्या कुत्र्याने एका महिलेचा पाय अक्षरशः फोडून काढला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्याचा प्रकार रविवार दि.२६ रोजी सकाळी झाला सदरील महिलेला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना रस्त्याअभावी जखमी महिलेला नातेवाईकांनी उचलून नदी पार केली. पुराच्या पाण्यात जीव मुठीत (पान ७ वर)
घेऊन हा प्रवास करताना नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागली, हा प्रकार देखील गेवराई तालुक्यातील मारोतीचीवाडी त उमापूर रस्त्यावरील अमृता नदीवरील आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील मारोतीचीवाडी येथील शारदा वसंत पाटोळे (वय ४५) या महिलेवर सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये शारदा पाटोळे यांचा एक पाय कुत्र्याने अक्षरशः फोडून काढल्याने मोठा रक्तस्त्राव होऊ लागला. यानंतर जखमी शारदा पाटोळे यांना नातेवाईक उपचारासाठी उमापूर येथे घेऊन जात असताना रस्त्याअभावी त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. यावेळी जिवाची पर्वा न करता नातेवाईकांनी जखमी शारदा पाटोळे यांना उचलून पुराच्या पाण्यातून नदी पार केली. आज सकाळीच याच नदीवर भोजगाव येथील सुदर्शन संत या ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रात्री झालेल्या पावसाने नदीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. त्यातच मारोतीचीवाडी येथील हा नदी पार करतानाचा जीवघेणा प्रवास हा थक्क करणारा आहे. दरम्यान नदी पार केल्यानंतर जखमी शारदा पाटोळे यांना एका वाहनातून उमापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्याने पुढील उपचारासाठी बीड रुग्णालयात रेफर करण्यात आले असल्याचे सांगितले जाते.

Most Popular

error: Content is protected !!