Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeशेतीमांजरा धरणाचे बारा दरवाजे उघडले केजडी, मांजरा नदी ओसांडून वाहू लागली

मांजरा धरणाचे बारा दरवाजे उघडले केजडी, मांजरा नदी ओसांडून वाहू लागली


केज (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये रात्री पुन्हा धुव्वाधार पाऊस पडला. या पावसाने आहे त्या खरीप पिकांचे नुकसान होऊ लागले. मांजरा धरण यापुर्वीच भरल्याने या धरणामध्ये पाण्याचा ओघ सुरुच असल्याने आज सकाळी पुन्हा धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले. दरवाजे उघडल्यामुळे मांजरा नदी ओसांडून वाहू लागली. केजडी नदीलाही पुर आला असून नदी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.


बीड जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे छोटेमोठे नद्या-नाल्या भरून वाहत असून केज तालुक्यातील मांजरा धरण यापुर्वीच भरलेले होते मात्र रात्री पडलेल्या पावसामुळे धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले. मांजरासह केजडी नदी ओसांडून वाहत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील पुल खचल्यामुळे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे.

Most Popular

error: Content is protected !!