Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडभारत बंद आंदोलनामध्ये धारूर येथील शेतकरी व नागरिक सहभागी

भारत बंद आंदोलनामध्ये धारूर येथील शेतकरी व नागरिक सहभागी


किल्ले धारूर (रिपोर्टर)-शेतकर्‍यांसाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये धारूर शहरातील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते नागरिक शालेय पोषण आहार महिला संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्या महिला सहभागी झाल्या होत्या भारत बंदला धारूर शहरांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी आज आपापली दुकाने बंद ठेवली आहेत तसेच शेतकरी संघटनांनी बंद पुकारून येथील शिवाजी चौकामध्ये एक तास रस्ता रोको आंदोलन केले आहे यात सामाजिक कार्यकर्ते मोहन लांब ,अशोक थोरात ,कॉम्रेड दादासाहेब सिरसट ,कॉम्रेड काशिराम सिरसट यांच्यासह महिला कार्यकर्त्या तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याबाबतच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे धारूर शहरातील मेन रोड वरती फेरी काढून शेतकर्‍यांसाठी बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनांनी व्यापारी बांधवांना केले होते यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या

Most Popular

error: Content is protected !!