Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमकष्टाच्या पैशावर चोराचा डल्ला शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

कष्टाच्या पैशावर चोराचा डल्ला शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या


बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक घटना..
बीड (रिपोर्टर)-आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जो माल शेतात तग धरून आहे त्याला कवडीमोलभाव मिळत आहे. एवढ असताना तग धरून असलेल्या शेतकर्‍याने, घाम गाळून शेतात पिकवलेल्या उडीदाच्या पैशावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने, तणावात आलेल्या वृद्ध शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


ही धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील आष्टा येथे आज सकाळी उघडकीस आली. कांतीलाल बाबासाहेब गळगटे (वय 59 रा.आष्टा) असं आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचं नाव आहे.
आष्टी तालुक्यातील आष्टा ह.ना.येथील बाबासाहेब गळगटे या शेतकर्‍याने, जामखेडच्या बाजारात उडीद विकला. त्याची पट्टी 25 हजार रुपये आली होती. हे पैसे घेऊन घराकडे जात असताना, चोरट्याने त्यांच्या पैशाचा बॅगवर डल्ला मारला आणि रक्कम लंपास केली.या प्रकारानंतर तणावात आलेल्या कांतीलाल बाबासाहेब गळगटे या शेतकर्‍यांने काल 26 सप्टेंबरला टोकाचे पाऊल उचलले. शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविवून आत्महत्या केली. दरम्यान याप्रकरणी आष्टी पोलीस पुढील तपास करत असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!