Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यात पावसाचा कहर अनेक गावांनी रात्र जागून काढली

जिल्ह्यात पावसाचा कहर अनेक गावांनी रात्र जागून काढली


दोनशेपेक्षा अधिक जनावरे दगावली, केज, धारूर, अंबाजोगाईत पावसाचा हाहाकार, एनडीआरएफचे पथक तैनात, मदतीसाठी हेलिकॉप्टरला पाचारण, अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी गावात शिरले, छोटे-मोठे पुल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, मांजरा धरणाचे 12 दरवाजे उघडले, वाण नदीला पुर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी, आपेगावकरांनी रात्र जागून काढली, शेतात अडकलेल्या दहा जणांची आज सकाळी सुटका झाली, बीड, अंबाजोगाई, केज, माजलगाव, धारूर तालुक्यात अतिपाऊस, आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, गेवराई तालुक्यातही धुव्वाधार, आधीच्या पावसाने शेती उद्ध्वस्त झाली होती, पुन्हा पावसाच्या रौद्ररुपाने होती नव्हती शेती पाण्यात, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान


बीड/अंबाजोगाई/केज/धारूर/गेवराई (रिपोर्टर)- रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातले नद्या-नाले ओसांडून वाहू लागले. अनेक ठिकाणी रस्त्यावरचे पुल वाहून गेल्याने अनेक गावांचे संपर्क तुटले. मांजरा धरणासह माजलगाव धरण शंभर टक्के भरल्याने मोठ्या प्रमाणावर धरणातून पाणी नदी पात्रात सोडल्याने याचा फटका नदी शेजारच्या गावांना बसला. अंबाजोगाईच्या आपेगावात पाणी घुसले.

243284321 1284814348617623 4526392106216188540 n

पुर्ण रात्र गावकर्‍यांनी जागून काढली. शेतात अडकलेल्या काहींना आज सकाळी पाण्याबाहेर काढण्यात आले. इकडे धारूर तालुक्यातही मुसळधार पावसामुळे हाहाकार उडवून दिला. केज तालुक्यात महामार्गावरील पुल वाहून गेल्याने वाहतूक पुर्णत: वळवण्यात आली. मालेगावच्या पाझर तलावाला मोठे भगदाड पडले. कुंबेफळमध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले, काशीदवाडीत दहा घरे पडली.

243096060 602061467826731 8676366406947742479 n

तिकडे अंबाजोगाईत आवरगावच्या नळकांडी पुलावरून एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. सुदैवाने यात जीवीत हाणी झाली नाही. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर पशूहानी झाली असून छोटे-मोठे दोनशेपेक्षा अधिक जनावरे दगावल्याची माहिती उपलब्ध आहे. गेवराई तालुक्यात पावसाने धुमाकूल घातल्याने काही गावांचे संपर्क तुटले. विद्रुपा नदीला पुर आल्याने रेवकी गावात पाणी शिरले.

अंबाजोगाईत मदतीसाठी हेलिकॉप्टर पाचारण
जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, माजलगाव, केज तालुक्यात हाहाकार उडाल्याने अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील अनेक गावांना पाण्याने वेडा पडला. बंधारे फुटले, पुले वाहून गेले, ग्रामस्थांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ बोडसहीत तैनात करण्यात आले आहे. तर दुपारपर्यंत अंबाजोगाई येथे हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात येणार आहे.

माजलगाव धरणातून 80 हजार क्युसेक्सने पाणी सोडले
माजलगावचे धरण पूर्णत: भरले असून रात्री झालेल्या पावसाने नदीला महापूर आला आहे. पाण्याची वाढलेली आवक पाहता धरणाच्या सांडव्यातून 80 हजार 534 क्युसेसने पाणी सोडण्यात आले. सध्या माजलगाव धरण व पानलोट क्षेत्रातील सर्व धरण पुर्णत: भरले असल्याने नदीकाठच्या गावकर्‍यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर उमरी (बु.), सांडसचिंचोली, साळेगाव तर वडवणी तालुक्यातील हरिश्‍चंद्र पिंप्री येथील गावकर्‍यांचा संपर्क तुटलेला आहे. या परिसरामध्ये नद्यांना पाणी आलेले आहे.

Most Popular

error: Content is protected !!