बीड (रिपोर्टर)ः- बीड बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. याला शिवाजी नगर पोलीसच खतपाणी घालत असल्याचा आरोप प्रवाशांनमधून केला जात आहे. तशा प्रकारच्या तक्रारीही काही फिर्यादीनी केल्या आहे. त्यानंंतर काही दिवस येथील चोरटे शांत होते. मात्र ते पुन्हा सक्रीय झाले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काल बसमध्ये चढतांना एका 50 वर्षीय इसमांचा खिसा कापून त्यातील 5160 रुपये गायब केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक हरीभाऊ कारगुडे वय-50 वर्ष रा.शाहू नगर बीड या इसमाने शिवाजी नगर पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकात गेले होते. बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून त्यांचा खिसा कापून त्यामधील 5160 रुपये अज्ञात चोरटटयाने गायब केले. त्यांच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.